pune Four-year girl Flags of 195 countries recognized in 3 minutes

कोणी खेळात आपली कामगिरी दाखवते तर कोणी आपल्या बुद्धीतून दाखवते. पुणे जिल्ह्यातील चिमुकलीने जागतिक पातळीवर आपला विक्रम जमा केली आहे. दुबईत झालेल्या एका अनोख्या स्पर्धेत आपल्या बुद्धिकौशल्यातून या चिमुकलीने अवघ्या 3 मिनिटात तब्बल 195 देशांचे ध्वज ओळखले आहे. ईशानवीचे असे तिचे नाव असून ती केवळ 4 वर्षांची आहे.

    पुणे : कोणी खेळात आपली कामगिरी दाखवते तर कोणी आपल्या बुद्धीतून दाखवते. पुणे जिल्ह्यातील चिमुकलीने जागतिक पातळीवर आपला विक्रम जमा केली आहे. दुबईत झालेल्या एका अनोख्या स्पर्धेत आपल्या बुद्धिकौशल्यातून या चिमुकलीने अवघ्या 3 मिनिटात तब्बल 195 देशांचे ध्वज ओळखले आहे. ईशानवीचे असे तिचे नाव असून ती केवळ 4 वर्षांची आहे.

    मूळचे आंबेगाव तालुक्यातील असणारे चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव-पाटील हे व्यवसाय निमित्त दुबई येथे स्थायिक झालेत. त्यांची 4 वर्षे 11 महिन्यांची कन्या ईशानवी बाळासाहेब आढळराव-पाटील हिने अनेक विक्रमांना गवसणी घातली. 15 जून रोजी झालेल्या दुबई येथे एका अनोख्या स्पर्धेत ईशानवी हिने यश संपादन केले आहे.

    तिने 195 देशांचे झेंडे ओळखून त्यांच्या राजधान्या केवळ 3 मिनिटे 10 सेकंद इतक्या फास्ट स्पीडने सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. तिने जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.