पुण्यात गेल्या चोवीस तासांत १७७ कोरोनाबाधित तर ५१४ रुग्णांना डिस्चार्ज

ऍक्टीव्ह कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या आतमध्ये

    पुणे : शहरात मागील चोवीस तासांत१७७ कोरोना रुग्ण आढळले असून बरे झालेल्या ५१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यातील १५ जणांसह २६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील ऍक्टीव्ह कोरोना बाधितांची संख्या चार हजारांच्या आतमध्ये आली आहे.

    शहरात आजमितीला ३ हजार ९४३ ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. १ हजार २४९ ऑक्सीजनवर आहेत. त्यापैकी ५१४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. शहरातील आतापर्यंत ४ लाख ७२ हजार ४३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यौकी ४ लाख ६० हजार ७८ बरेही झाले आहेत. तर ८ हजार ४१० जणांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत ४ हजार ७७५ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.