पुण्यात गेल्या २४ तासांत ३३१ नवीन कोरोनाबाधित

शहरातील काेराेनाचा संसर्ग स्थिर झाल्याचे दिसत आहे. गेल्या चाेवीस तासांत एकुण ५ हजार ८२९ जणांची चाचणी केली गेली. यात ३३१ रुग्ण आढळून आले. सध्या शहरांत ३ हजार १८२ सक्रीय रुग्ण असून, त्यापैकी ५१७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ८६२ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत एकुण ४ लाख ७३ हजार ८७० जणांना काेराेनाची लागण झाली

    पुणे : शहरात गेल्या चाेवीस तासांत काेराेनाबाधित ३३१ नवीन रुग्ण आढळून आले आहे. ४५९ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शहरातील दहा जणांसह एकुण २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    शहरातील काेराेनाचा संसर्ग स्थिर झाल्याचे दिसत आहे. गेल्या चाेवीस तासांत एकुण ५ हजार ८२९ जणांची चाचणी केली गेली. यात ३३१ रुग्ण आढळून आले. सध्या शहरांत ३ हजार १८२ सक्रीय रुग्ण असून, त्यापैकी ५१७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ८६२ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत एकुण ४ लाख ७३ हजार ८७० जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६२ हजार २२२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ४६६ जणांचा बळी गेला आहे.