पुण्यात गेल्या २४ तासांत २९७ काेराेनाबाधित रुग्ण आढळले तर ५२९ रुग्ण काेराेनामुक्त

शहरातील काेराेनाची दुसरी लाट ओसरत आहे. गेल्या चाेवीस तासांत एकुण ५ हजार ५२ जणांची चाचणी केली गेली. यामध्ये २९७ जण काेराेनाबाधित आढळून आले आहेत. सध्या शहरात ३ हजार ६९९ काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५८९ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, १ हजार १७८ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

    पुणे : गेल्या चाेवीस तासांत शहरांत एकुण २९७ काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले आहे, तर ५२९ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. पुण्यातील बाराजणांसह एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

    शहरातील काेराेनाची दुसरी लाट ओसरत आहे. गेल्या चाेवीस तासांत एकुण ५ हजार ५२ जणांची चाचणी केली गेली. यामध्ये २९७ जण काेराेनाबाधित आढळून आले आहेत. सध्या शहरात ३ हजार ६९९ काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५८९ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, १ हजार १७८ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत शहरांत एकुण ४ लाख ७२ हजार ७२८ रुग्णांना काेराेनाची लागण झाली. त्यापैकी सुमारे ४ लाख ६० हजार ६०७ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ४२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.