पुण्याच्या महापौरांचा मान पहिला, अशी चूक पुन्हा होणार नाही; उपमुख्यमंत्री, अजित पवारांचं विधान

पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतो. मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही, असं आश्वासन अजित पवार यांनी यावर दिलं आहे. मुंबईतील बैठकीला मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं. मात्र बातम्या वेगळ्या आल्यात. आज त्यासंदर्भात माझी महापौर आणि माझी चर्चा झाली. प्रथम नागरिक या नात्याने महापौरांचा मान असतो. त्यासंदर्भात काही गैरसमज झाले, असं अजित पवारांनी सांगितलं.

    पुणे : मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण न दिल्यावरुन वाद झाला होता. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

    अजित पवार काय म्हणाले ?

    पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतो. मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही, असं आश्वासन अजित पवार यांनी यावर दिलं आहे. मुंबईतील बैठकीला मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं. मात्र बातम्या वेगळ्या आल्यात. आज त्यासंदर्भात माझी महापौर आणि माझी चर्चा झाली. प्रथम नागरिक या नात्याने महापौरांचा मान असतो. त्यासंदर्भात काही गैरसमज झाले, असं अजित पवारांनी सांगितलं. ते शुक्रवारी पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.

    दरम्यान यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मागच्या बैठकीला ऑफिसच्या कामामुळे मला येता आलं नाही. दुर्दैव असं की एखादी बैठक टाळली तर लगेच चर्चा वेगळी होते. आंबिल ओढ्याच्या तोडकामासंदर्भात जी चर्चा झाली, त्याबाबत माझा काही संबध नाही. यामध्ये बऱ्याचदा राजकारण आणलं जातंय, असं अजित पवार म्हणाले.

    तसेचं राज्य सरकार नवीन 500 रुग्णवाहिका घेणार आहे. पुण्याचा पोझिटिव्हीटी रेट गेल्या आठवड्यात 4.6 टक्के होता आणि 5.3 टक्के झाला आहे. जी नियमावली होती तीच नियमावली कायम ठेवण्याचा निर्णय झालाय, अशी माहिती अजित पवारांनी दिली.