Pune Metro :   या कारणामुळे बोगद्यात फडकला ‘तिरंगा’

पुणे: पुणे मेट्रोचे काम सिव्हिल कोर्टपर्यंत पूर्ण झाले. सिव्हिल कोर्ट इथे मेट्रोचे भूयारी स्थानक आहे. तिथून पुढे शिवाजीनगरकडे साध्या यंत्राने खोदकाम करण्यात येत होते. शिवाजीनगरपासून पुढे मात्र १०० फूट लांब टनेल बोअरिंग यंत्राने काम होत होते. हे दोन्ही बोगदे सोमवारी दुपारी जमिनीखाली एकत्र होऊन एकच सलग बोगदा तयार झाला.

या आनंदात आज जमिनीखाली २८ मीटर खोलीवर बोगद्यात तिरंगा फडकावून कामाचा आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी महामेट्रो चे संचालक (प्रकल्प) अतूल.गाडगीळ, रामनाथ सुब्रमण्यम, हेमंत सोनवणे, ठेकेदार कंपनीचे वरिष्ठ अभियंते तसेच कामगार ऊपस्थित होते. आता मुठा नदीच्या खालून हा बोगदा पूढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे.