पुणे महापालिका : समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यावर राजकारण सुरु

गुरुवारी खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार , नियोजित विकासावर होऊ शकतो परिणाम

  पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी खास सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून येत्या गुरुवारी १५ जुलैला ही खास सभा होणार आहे. या गावांच्या िवकास आराखड्यावरून राज्यातील महाविकास अाघाडी सरकार अािण महापािलकेतील सत्ताधारी भाजप यांच्यात संघर्ष हाेण्याची शक्यता अाहे. त्याचा परीणाम या गावांच्या िनयाेजित विकासाला बसू शकताे.

  नुकतेच ही तेवीस गावे महापािलका हद्दीत समाविष्ठ केली गेली. तेव्हापासूनच या गावांच्या िवकास अाराखड्याच्या िवषयावर चर्चा सुरू झाली हाेती. पुणे महानगर क्षेत्र िवकास प्राधिकरणाने ( पीएमअारडीए )या गावांचा िवकास अाराखडा तयार केला अाहे. ताेच कायम ठेवण्यासंदर्भात महापािलका प्रशासन अािण महाविकास अाघाडीचे नेते अनुकुल अाहेत. तर महापािलकेतील सत्ताधारी भाजपने शहर सुधारणा समितीत महापािलकेने या गावांचा विकास अाराखडा तयार करावा असा प्रस्ताव मंजुर केला अाहे. अाता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना (एमआरटीपी) अधिनियम १९६६ च्या कलम २१ नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेने नव्याने समाविष्ट झालेल्या या २३ गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे अशी भुिमका सत्ताधारी भाजपने घेतली अाहे. या प्रस्तावावर १५ जुलै राेजी खास सभा अायाेजित केली अाहे.

  या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची मंजुरी देण्यासाठी पालिकेच्या मुख्य सभेची मान्यता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयावर खास सभा बोलविण्यात यावी, अशी लेखी मागणी स्थायी समितीच्या आठ सभासदांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार १५ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता ही खास सभा आयोजित करण्यात आली आहे. दृकश्राव्य (ऑनलाईन) माध्यमातून ही सभा होणार आहे अशी माहीती सभागृह नेते गणेश बीडकर यांनी दिली.

  महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने आलेल्या या २३ गावांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी या गावांचा विकास आराखडा तयार होणे महत्वाचे आहे. त्यामुळे ही खास सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.

  - मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महानगरपालिका

  “समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या खास सभेसाठी उपस्थित राहावे, असा ‘व्हीप’ भारतीय जनता पक्षाच्या सर्व सभासदांना बजाविण्यात आला आहे. या गावंाचा िवकास जलदगतीने व्हावा यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.”

  – गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका