पुणे महापालिका विद्यार्थ्यांना देणार टॅब ; संख्या निश्चित झाल्यानंतरच ही खरेदीची प्रक्रीया राबविली जाणार

-समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

  पुणे : काेराेनामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी महापािलकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना इंटरनेटसह टॅब देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. विद्यार्थी संख्या निश्चित झाल्यानंतरच ही खरेदीची प्रक्रीया राबविली जाणार आहे, अशी माहीती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

  माजी उपमहापाैर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासंदर्भात स्थायी समितीसमाेर प्रस्ताव मांडला हाेता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात अध्यक्ष रासने म्हणाले, ‘‘ ‘महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांत एकुण एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. परंतु बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक उपकरणे आणि इंटरनेटची सेवा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. या शैक्षणिक वर्षात अद्याप शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे या वर्षी ही ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करावी लागणार आहे.’’

  महापालिका दरवर्षी डीबीटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पुस्तके, गणवेश, रेनकोट, बूट, स्वेटर आदी शालेय साहित्यासाठी ठराविक रक्कम भरत असते. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात ही तरतूद खर्ची पडली नाही. या वर्षी सुद्धा डीबीटी साठी १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डीबीटी ऐवजी या उपलब्ध तरतुदीतून चौथी ते आठवीच्या सुमारे ३८ हजार विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटसह टॅब खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नियमित ऑनलाइन शिक्षणाची सुविधा निर्माण होईल.’’

  महापालिका कर्मचार्‍यांना वेतनवाढ

  काेराेना कालावधीत काम करणाऱ्या महापािलकेच्या सर्व कर्मचार्यांना एक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष, सर्वेक्षण आदी स्वरुपाची कामे या कर्मचाऱ्यांनी केली अाहे. त्यांना ही वेतनवाढ दिली जाणार आहे.

  क्षयरोग नियंत्रण कर्मचार्‍यांसाठी सुरक्षा कवच
  राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रक कार्यक‘माअंतर्गत पुणे महापालिकेत कार्यरत असणार्‍या ४८ कर्मचार्‍यांना वैद्यकीय लाभ, सुरक्षा कवच आणि जोखीम भत्ता देण्यात येणार आहे.

  सदनिकांची विक्री हाेणार
  महापालिकेची मालकी असलेल्या इमारतीत भाडेतत्त्वावरील सदनिका संबंधित भाडेकरूंच्या नावावर करण्यात येणार आहे. शहर सुधारणा समितीनेने केलेल्या या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. सुमारे दिड हजार सदनिकांची रेडीरेकनरच्या दरानुसार विक्री केली जाईल.