Dont give bonus by breaking pune municipal Corporations deposits Ujjwal Keskar

या उपक्रमानुसार रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्याघरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी दिला आहे. शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यास देण्यासाठी या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे. तशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

  पुणे: कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात आता कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे अनके रुग्णांना पुन्हा रुग्णालायात दाखल करावे लागत आहे. यावर तोडगा म्हणून पुणे महापालिकेनं ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमानुसार कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना घरीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करुन दिली जात आहे.


  या उपक्रमानुसार रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्याघरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी दिला आहे. शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यास देण्यासाठी या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे. तशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. पुणे महापालिकेच्या या उपक्रमामुळे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. मात्र ऑक्सिजन घरी नेता असताना नागरिकांना या अटींचे पालन करने आवश्यक असणार आहे.

  नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असेल.

  रुग्णाचा कोड पॉझिटिव्ह रिपोर्ट किंवा संशयित कोविड असणं गरजेचं.

  डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी किती दिवसांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करण्यास सांगितला याची माहिती.

  रुग्णाचे हमीपत्र.

  रुग्णाचा संपूर्ण निवासी पत्ता व त्याचा पुरावा, इलेक्ट्रिक बिल आणि आधार कार्ड