उच्च शिक्षाणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेची ‘वॉक इन लसीकरण’ मोहीम ; २ तास २०० जणांनी केली नोंदणी

पुणे महापालिकेनं सुरु केलेल्या वॉक इन लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्रही पाहायला मिळालं. याठिकाणी अवघ्या २ तास २०० लसीचा कोटा संपला. त्यानंतर उद्या होणाऱ्या लसीकणासाठी आज नोंदणी सुरु करण्यात आली.

    पुणे: कोरोनाच्या निर्बंधामध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे. ही मागणी लक्षात घेत पुणे महापालिकेने वॉक इन लसीकरण सेवा सुरु केली. महापालिकेच्या या मोहिमेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करणारं ट्वीट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबई, ठाण्यातही शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मोहीम राबवली जात आहे.

    पुणे महापालिकेनं सुरु केलेल्या वॉक इन लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्रही पाहायला मिळालं. याठिकाणी अवघ्या २ तास २०० लसीचा कोटा संपला. त्यानंतर उद्या होणाऱ्या लसीकणासाठी आज नोंदणी सुरु करण्यात आली. या विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही. तर त्यांना ऑफलाईन नोंदणीद्वारेच लस दिली जात आहे. दरम्यान, विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे पत्र देणे गरजेचं आहे. त्याशिवाय त्यांना लस दिली जाणार नाही.असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम हात घेतलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज या उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं. हा उपक्रम राबवण्यासाठी पुणे महापालिकेला ‘जिव्हीका हेल्थकेअर’ आणि ‘माय व्हॅक्सीन’ची साथ लाभली आहे. लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ५ मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.