पुणे नगर महामार्ग पुन्हा गेला पाण्यात

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात गेल्या वर्षी दीड महिना रस्ता पाण्यात जावून मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले असल्याचा अनुभव पाठीशी असुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरात कोणतीच कार्यवाही न केल्याने सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे नगर महामार्गावरील खड्डे पुर्ववत झाल्याने व रस्ता पुर्णत: पाण्यात गेल्याने दोन्ही बाजुला तीन ते चार किलोमिटर रांगा लागल्याने नाहक प्रवाशांना फटका बसला आहे.

 सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात गेल्या वर्षी दीड महिना रस्ता पाण्यात जावून मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले असल्याचा अनुभव पाठीशी असुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरात कोणतीच कार्यवाही न केल्याने सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे नगर महामार्गावरील खड्डे पुर्ववत झाल्याने व रस्ता पुर्णत: पाण्यात गेल्याने दोन्ही बाजुला तीन ते चार किलोमिटर रांगा लागल्याने नाहक प्रवाशांना फटका बसला आहे. बांधकाम विभागाचे आतातरी डोळे उघडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गावर गेल्या वर्षी आक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर रस्त्यावर पडलेले खड्डा बुजविण्यास बांधकाम विभागास अपयश आल्याने वाहतुक कोंडीला प्रवासी व वाहनचालकांना सामोरे जावे लागात होते. हा अनुभव पाठीशी असुनही गेल्या वर्षभरात सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीच कार्यवाही न केल्याने पहिल्याच मुसळधार पावसामुळे व नैसर्गिक ओढे नाल्यांवर केलेल्या अतिक्रमण मुळे व ओढे नाल्यांचा नेसर्गिक प्रवाह बुजविले असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले.
-वाहतुकदारांना तासंतास कोंडीत अडकावे लागते
अनेक छोटी वाहने बंद पडत असल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षभरात वेळ असुनही व रस्त्याचे टेंडर होऊनही काम का? केले नाही. असा सवाल उपस्थित होत असताना आता लॉक डाऊनच्या काळात रस्त्याच्या दुतर्फा गटारांचीही कामे का केली नाही असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. काही दिवसांपुर्वि आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी कोरेगाव भीमाच्या समस्यांची पाहणी केली मात्र तरीही कामाला सुरुवात झाली नसल्याने रस्त्यावरील पाण्यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीला व कोंडीत अडकनाऱ्या रुग्नवाहीकेतील रुग्ण दगावला तर त्याला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होत आहे. तर पुण्यातून कोरेगाव तसेच शिक्रापूरला पोहोचण्यास अनेकांना तासंतास कोंडीत अडकावे लागले. अर्धा तास अंतराच्या रस्त्यास तीन ते चार तास तिष्ठत थांबावे लागले. वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस व पोलीस मित्र करित होते.
-बांधकाम विभागाला वर्षानंतरही रस्ता दुस्तीचा मुहुर्त मिळेणा
गेली वर्षभरापुर्वि कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथिल महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे झालेली दिड महिना वाहतुक कोंडीतुन वर्षानंतरही कोणतीच सुधारणा न केल्याने आजही रस्त्यावर दिड ते दोन फुट पाणी साचल्याने वाहतुक कोंडी होऊन चार ते पाच किलोमीटरपर्यंंत रांगा लागल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन या वाहतुक कोंडीचा रुग्णवाहिका, उदयोजक, शेतकरी, कामगार वर्गाला बसला होता.
– लॉक डाऊनचा फायदा का उचलला नाही?
मागील वर्षी आक्टोंबर पासुन रस्त्यावरील कामांना मुहुर्त न मिळाल्याने व दरम्यान २३ मार्च पासुन लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर रस्त्यावर वाहतुक कमी व लोकांची वर्दळ नसुनही सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा फायदा का उठवता आला नाही असा सवाल उपस्थित होत आहे.