पुणे,पिंपरी-चिंचवडकरांना मास्क बंधनकारक : अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील काही भागांत मास्कचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यांना मास्क बंधनकारक केले पाहिजे. याबाबत दुपारी पुणे येथे बैठक होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकरण्याचा विचार सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation)  चिंचवड येथे आटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे (Covid Care Center) उद्घाटन शुक्रवारी झाले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मास्क (masks) बंधनकारक करून मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत बैठकीत चर्चा करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या भाषणात दिली आहे.

अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील काही भागांत मास्कचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यांना मास्क बंधनकारक केले पाहिजे. याबाबत दुपारी पुणे येथे बैठक होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकरण्याचा विचार सुरू आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात सध्या २८ हजार १४२ एकूण कोरोना रुग्ण आहेत. तर, ८७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच एक लाखांपेक्षा जास्तीचे बिल असल्यास त्याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अव्वाच्यासव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.