कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठीएकत्रित ग्लोबल टेंडर काढण्यासाठी पुणे, पिंपरी महापालिका प्रयत्नशील

लहान मुलांकरिता वायसीएम रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या १५०, आयसीयूच्या ३० खाटा तयार ठेवल्या जाणार आहेत. त्यातील नवजात बालकासाठी १५ आणि १८ वर्षाखालील मुलांसाठी १५ बेड राखीव असतील. जिजामाता हॉस्पिटलमध्ये मुलांसोबत आईला राहता येईल, असे नियोजन केले जात आहे.

    पिंपरी: कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेका संयुक्तपणे जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) काढण्याबाबत चाचपणी करत आहे. आयुक्तांबरोबरच पुण्याच्या आणि पिंपरीच्या महापौरांमध्ये प्राथमिक चर्चादेखील झाली आहे. जागतिक निविदा काढण्याची प्रयत्न सुरु असून पिंपरी महापालिकेची २५ लाख डोसची मागणी आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. तसेच जून – जुलैनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.

    महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वपुर्ण आहे. लस उत्पादक कंपनीकडून थेट लस खरेदी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेने संयुक्तपणे जागतिक निविदा काढावी, याबाबत चर्चा सुरु आहे. लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे का, लस किती मिळू शकते, कोणत्या दराने मिळेल, निविदेला प्रतिसाद मिळेला का, या शक्यता पडताळल्या जात आहेत. त्याची चाचपणी केली जात आहे. शहरातील १८ ते ४४ या वयोगटाची लोकसंख्या १२ लाख आहे. त्यानुसार प्रत्येकाला दोन डोस या नुसार २५ लाख डोसची महापालिकेची मागणी आहे.

    आयुक्त म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट जून – जुलैनंतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जाते. पण, गंभीर रुग्ण जास्त नसतील असे सांगितले जाते. त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. लहान मुलांवरील उपचारासाठी कर्मचाNयांना प्रशिक्षण देण्यात यणार आहे. त्यासाठीची यंत्रणा उभी करणे आव्हानात्मक आहे.

    लहान मुलांकरिता वायसीएम रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या १५०, आयसीयूच्या ३० खाटा तयार ठेवल्या जाणार आहेत. त्यातील नवजात बालकासाठी १५ आणि १८ वर्षाखालील मुलांसाठी १५ बेड राखीव असतील. जिजामाता हॉस्पिटलमध्ये मुलांसोबत आईला राहता येईल, असे नियोजन केले जात आहे. घरकुलमधील चार इमारतीत ‘सीसीसी’ वेंâद्र केले जाईल. तेथे लक्षणेविरहित मुलांना आणि त्यांच्यासमवेत पालकांना ठेवले जाईल.

    व्हेंटिलेटर, आयसीयू खाटा उपलब्ध असलेल्या खासगी रुग्णालया व्यवस्थापनासमवेत प्राथमिक चर्चा सुरु आहे. शहरात १५० बालरोग तज्ज्ञ आहेत. गरजेनुसार त्यांची सेवा अधिग्रहित केली जाईल. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध केला जाईल. शहरातील १२ वर्षाखालील मुलांची माहिती गोळा करत आहोत. कोणत्या परिसरात जास्त मुले आहेत. त्याची माहिती घेऊन जनजागृती केली जाणार आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी कॉल सेंटर सुरु केले आहे. कोरोनातून बरे होऊन गेलेल्या २ हजार ३६९ लोकांशी दोन दिवसात संपर्वâ साधण्यात आला. त्यापैकी ६२ लोकांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आली. त्यातील ३२ बरे होऊन गेले.

    ३८ जणांवर उपचार सुरु आहेत. ९ जणांचा मृत्यू झाला. निदान लवकर झाल्यास लोकांचा जीव वाचवता येईल, असेही आयुक्त पाटील म्हणाले. आकुर्डी, थेरगाव रुग्णालय वैद्यकीय सेवेसाठी तयार असून येत्या सोमवार (दि.२४) पासून तिथे विविध आजार असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातील. रुग्णसंख्या मर्यादित असेल, तेथे ‘ड्राय रन’ घेतला जाईल,असेही पाटील यांनी नमूद केले.

    ६२०० रुग्णखाटा रिकाम्या

    पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय खाटांची उपलब्धता देखील वाढली आहे. आजमितीला शहरात ६ हजार २०० खाटा रिकाम्या आहेत. त्यात ३८ व्हेंटिलेटर, २९४ आयसीयू, २ हजार २४६ ऑक्सिजन आणि कोविड केअर सेंटरमधील २ हजार २०० खाटा रिक्त आहेत.सद्यस्थितीत खाटांची कमतरता नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.