pooja chavhan

राजीनाम्यानंतर संजय राठोड यांना आत्महत्या प्रकारणात क्लीन चीट मिळाल्यानंतर आता या त्यांची पुन्हा मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

    पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येमुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

    'आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही', असा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांना दिला आहे.

    त्यानंतरच संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचे पुढे येत आहे. त्यांच्या या जबाबानंतर या संदर्भातील एक अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला असल्याची माहिती समोर आली आहे.

    काय आहे पुजा चव्हाण प्रकरण

    प्रकरणातील पूजा चव्हाणने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप समोर आले, काही दिवस संजय राठोड अज्ञातवासात होते. विरोधकांच्या दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र राजीनाम्यानंतर संजय राठोड यांना आत्महत्या प्रकारणात क्लीन चीट मिळाल्यानंतर आता या त्यांची पुन्हा मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.