पुणे पोलिसांना मिळणार केंद्रीय सशस्त्र दलाची एक तुकडी

पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय रमजानच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिस दलाच्या मदतीसाठी

पुणे :  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय रमजानच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय राखीव दलाची १२० जवानांची एक कंपनी  मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ताण कमी होणार आहे. 

कोरोनामुळे संचारबंदीची अंमलबजावणी करन्यासाठी मागील दोन महिन्यापासून पोलिस दल रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे  काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर ५५ वर्षावरील पोलिस कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. सलग दोन महिने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर कामाचा मोठा ताण आला आहे. त्यामुळे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे. लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून आगामी रमजान ईद  जवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० कंपन्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. या कंपन्या आल्यानंतर मुंबईवर राज्यातील विविध शहरांमध्ये  तैनात करण्यात येणार आहे.

 "पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या १२० जवानांची तुकडी  मिळणार आहे़.  शहरात कोरोनामुळे ६९ ठिकाणी  प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्याठिकाणी पोलिसांना ही तुकडी बंदोबस्तासाठी सहाय्य करणार आहे."

 -मितेश घट्टे, विशेष शाखा ,पोलीस उपायुक्त