पुणे: पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपन्यांच्या  फायद्याची; कृषी मंत्री दादा भुसेंचा दावा

पीक विमा कंपन्यांनी गेल्या वर्षात तब्बल चार हजार आठशे कोटींचा नफा कमावल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. मागील वर्षात पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत राज्य, केंद्र आणि शेतकरी मिळून 5800 कोटींचा हफ्ता भरण्यात आला. त्यातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी जेमतेम 1000 कोटींचे वाटप करण्यात आलं. त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपन्यांसाठी फायद्याची ठरत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे दादा भुसे म्हणाले.

    पुणे : पीक विमा कंपन्यांनी गेल्या वर्षात तब्बल चार हजार आठशे कोटींचा नफा कमावल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे(Agriculture Minister Dada Bhuse) यांनी दिली. मागील वर्षात पंतप्रधान पिक विमा योजने(Prime Minister’s Crop Insurance Scheme) अंतर्गत राज्य, केंद्र आणि शेतकरी मिळून 5800 कोटींचा हफ्ता भरण्यात आला. त्यातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी जेमतेम 1000 कोटींचे वाटप करण्यात आलं. त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा पिक विमा कंपन्यांसाठी फायद्याची ठरत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे दादा भुसे म्हणाले.

    या पार्श्वभूमीवर पिक विमा कंपन्यांन्याच्या नफ्यावर मर्यादा घालून देण्याची योजना आहे. राज्यात केवळ बीड जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याची परवानगी केंद्राकडे मागण्यात आलीय, परंतु मध्य प्रदेश सरकारला बीड पॅटर्न राबवण्याची परवानगी मिळाली आहे.

    महाराष्ट्राला मात्र ही परवानगी मिळत नसल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. दादा भुसे यांनी पुण्यात रब्बी हंगाम आढावा बैठक घेतली. त्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांची माहिती दिली.