पुणेकरांनी गणेशोत्सव काळात ऑनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद घ्यावा; मंडळांचे पुणेकरांना आवाहन

यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे

  पुणे: कोरोनाच्या सावटामुळे मागील वर्षी गणेशोत्सव सर्वांनीच साधेपणाने साजरा केला होता. तसेच नागरिकांना,भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते.त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी केलं आहे.

  १)मानाचा पहिला श्री कसबा गणपती
  २)मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
  ३)मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती
  ४) मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
  ५) मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि

  – प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ या मंडळांनी एकत्रित येऊन पुणेकरांना आवाहन केले आहे.

  यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.