Murder

बिबवेवाडी परिसरात यश लॉन्स आहे. त्यासमोर मोकळे ग्राऊंड आहे. येथे कायम मुले खेळत असतात. तसेच, कबड्डी व इतर क्रिडा प्रकारांचा सराव करत असतात. सायंकाळी ही मुलगी देखील तेथे कबड्डीचा सराव करण्यास आली होती. यादरम्यान, साडे पाच ते पावणे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तीन मुले तेथे आली. त्यातील एकाने या मुलीला बाजूला घेऊन बोलण्यास सुरूवात केली. त्यात त्यांच्यात वाद झाले असता एकाने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यास सुरूवात केली.

    पुणे : बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरात १४ वर्षीय शाळकरी मुलीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून निर्घुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी कबड्डीपट्टू होती. मैदानातच तिच्यावर गर्दीच्या वेळी वार करण्यात आल्याने एकच थरार उडाला आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असल्याचा संशय आहे.  क्षितीजा अनंत व्यवहारे (वय १४) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात यश लॉन्स आहे. त्यासमोर मोकळे ग्राऊंड आहे. येथे कायम मुले खेळत असतात. तसेच, कबड्डी व इतर क्रिडा प्रकारांचा सराव करत असतात. सायंकाळी ही मुलगी देखील तेथे कबड्डीचा सराव करण्यास आली होती. यादरम्यान, साडे पाच ते पावणे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तीन मुले तेथे आली. त्यातील एकाने या मुलीला बाजूला घेऊन बोलण्यास सुरूवात केली. त्यात त्यांच्यात वाद झाले असता एकाने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यास सुरूवात केली. यादरम्यान, मैदानावर अनेक मुले व नागरिक होते. तरीही त्याने निर्दयीपणे या मुलीच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे एकच थरार उडाला होता. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर देखील आरोपी तिच्यावर वार करत होता. त्यानंतर तिघेजन त्याचठिकाणी हत्यारे टाकून पसार झाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तत्काळ बिबवेवाडी पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या मुलीचा एकतर्फी प्रेमातून खून झाल्याचा संशय आहे. अद्याप या आरोपींचा शोध लागलेला नाही. मुलगी बिबवेवाडी परिसरात राहत होती. तिचे वडिल पेपर टाकण्याचे काम करतात. तर ती आठवीच्या वर्गात शिक्षण घेते. ती उत्तम कबड्डी पट्टू होती. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.