पुणे होणार रात्री १० लाच बंद ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन सक्त

शाळा आणि कॉलेज ३१ मार्च बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.तसेच शहरातील उद्याने संध्याकाळी बंद राहणार आहेत. लग्न समारंभ, धार्मिक सोहळे इतर कार्यक्रमांना ५० टक्केच उपस्थिती बंधनकारक असणार आहे. शहरातील मॉल आणि चित्रपटगृहे रात्री दहापर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहे. बाजारपेठा, दुकाने यांना रात्री १० पर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे.

    पुणे: शहरात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधान भवन येथे आढावा बैठक घेतली. यावेळी लॉकडाऊन होणार की नव्याने निर्बंध आणणार याबाबत सर्व पुणेकरांचे या चर्चेकडे लक्ष होते. पण अजित पवारांनी तूर्तास लॉकडाऊनचा निर्णय न घेता पुणेकरांना दिलासा दिला आहे. मात्र याचवेळी त्यांनी पुणे शहर रात्री १० वाजता बंद करण्याची सूचना देखील देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पवार नेमके कुठले पाऊल उचलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह , लोकप्रतिनिधी, महापौर उपस्थित होते. या बैठकीत शहरातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेतल्याची माहिती आहे.

    पवार यांनी या बैठकीत शाळा आणि कॉलेज ३१ मार्च बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.तसेच शहरातील उद्याने संध्याकाळी बंद राहणार आहे. लग्न समारंभ, धार्मिक सोहळे इतर कार्यक्रमांना ५० टक्केच उपस्थिती बंधनकारक असणार आहे. शहरातील मॉल आणि चित्रपटगृहे रात्री दहापर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहे. बाजारपेठा, दुकाने यांना रात्री १० पर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. आणि रेस्टॉरंटमध्ये फक्त ५० टक्के उपस्थितीच ठेवण्याची सूचना देखील यावेळी पवार यांनी दिली आहे. लवकरच शहरातील निर्बंधांबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

    मागील काही दिवसांपासून पुणे जिल्हयात आणि राज्यांत रुग्णसंख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. पुण्यात काल एका दिवसातच १५०० च्या वर रुग्ण सापडले. नुकत्याच सादर केलेल्या पाहणी अहवालात हॉटेल, मॉल तसेच शाळा, कॉलेजमुळे संख्या वाढते आहे, असा अहवाल सादर करण्यात आला आहे.