पुणे विद्यापीठ प्रवेशप्रक्रियेला १० जुलैपर्यंत मुदतवाढ

विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठात प्रवेश मिळणे, हे बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात.

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संकुलातील पदवी आणि पदव्युत्तरच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून, आता विद्यार्थ्यांना १० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

    विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची प्रवेश परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठात प्रवेश मिळणे, हे बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात. मात्र अर्ज करण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत आहे. अजूनही काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता आले नाही. त्यामुळे मुदतीत वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार विद्यापीठाने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे शैक्षणिक प्रवेश विभागाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १० जुलैपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर विलंब शुल्कासह १५ जुलैपर्यंत विद्यार्थी करू शकतील. मात्र त्यानंतर अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी सांगितले. सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.