पुण्यात आता क्षेत्रीय कार्यालयात मिळणार जन्म – मृत्यूचे दाखले ; नागरिकांची गैरसाेय दूर हाेण्यास मदत

शहराचा विस्तार आणि लाेकसंख्या वाढ माेठ्या प्रमाणावर झाला आहे. शहरात रुग्णालयांची संख्या माेठी आहे. या रुग्णालयाच्या व्यवस्थापनालाही त्यांच्याकडील जन्म आणि मृत्यूबाबतची कागदपत्रे दरराेज महापालिकेच्या कार्यालयात पाठविणे शक्य नसते. परंतु आता कार्यालयाचे विकेंद्रीकरण झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाकडून तेथे जवळ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात कागदपत्रे वेळेवर पाेहचविणे शक्य आहे.

    पुणे : महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयात आता जन्म – मृत्यूची नाेंदणी आणि दाखले मिळणार आहे. यामुळे नागरीकांची गैरसाेय दुर हाेण्यास मदत हाेईल.महापालिकेचे जन्म मृृत्यू नाेंदणी कार्यालय हे कसबा पेठेत असून, या ठिकाणी नाेंदणी आणि दाखले देण्याचे काम केले जाते. रुग्णालयात हाेणाऱ्या जन्म – मृत्यूची माहिती तेथील व्यवस्थापनाने महापालिकेच्या जन्म – मृत्यू नाेंदणी कार्यालयात एकवीस दिवसांच्या आत पाठविण्याची मुदत आहे. परंतु, अनेकवेळा ही माहिती रुग्णालयांकडून वेळेवर दिली जात नाही. यामुळे कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन दाखले तयार करण्यासाठी विलंब लागताे. यामुळे अनेकवेळा नागरीकांना वेळेवर जन्म – मृत्यू चा दाखला मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात हाेत्या.

    यासंदर्भात नुकतेच झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापािलकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयात ही व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहीती सह आराेग्य अधिकारी डाॅ. कल्पना बळीवंत यांनी दिली.शहराचा विस्तार आणि लाेकसंख्या वाढ माेठ्या प्रमाणावर झाला आहे. शहरात रुग्णालयांची संख्या माेठी आहे. या रुग्णालयाच्या व्यवस्थापनालाही त्यांच्याकडील जन्म आणि मृत्यूबाबतची कागदपत्रे दरराेज महापालिकेच्या कार्यालयात पाठविणे शक्य नसते. परंतु आता कार्यालयाचे विकेंद्रीकरण झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाकडून तेथे जवळ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात कागदपत्रे वेळेवर पाेहचविणे शक्य आहे. तसेच नागरीकांनाही दाखला मिळविण्यासाठी कसबा पेठेतील कार्यालयात येण्याचा त्रास कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयात संगणक, प्रिंटर, मनुष्यबळ आदी उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती डाॅ. बळीवंत यांनी दिली.