Pune youth arrested for stealing over 1000 goats
Tzaneen, Limpopo Boerbok-en-Twanakruising lewer maklik rooi op wat soos Kalahari Reds lyk.

पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीकडून तब्बल सहा सहाचाकी, ४ चारचाकी आणि २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. पण, आरोपीकडे केलेल्या कसून तपासात एक आणखी धक्कादायक बातमी पुढे आली त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. याप्रकरणी २२ वर्षांच्या अलेक्स लवरेन्स ग्राम्सला पुण्यातील खडकी पोलिसांनी अटक केली आहे. तो खडकी बाजारातील एका गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. आणि त्याने आतापर्यंत एक नाही, दोन नाही तर ७० ठिकाणाहून हजारपेक्षा अधिक बकऱ्या चोरल्या आहेत. त्याच्या या कौशल्याने मात्र पोलिसही आश्चर्य चकित झाले आहेत.

पुणे : गुन्हेगारने कितीही सफाईदारपणे गुन्हा केला तरी तो काही ना काही धागेदोरे मागे ठेवतच असतो. मग तो गुन्हेगार कितीही हुशार असला आणि कितीही सफाईदारपणे गुन्हे करत असला तरी तो कायद्याच्या कचाट्यात सापडतो. अशाच प्रकारे आश्चर्यचकित करणारी चोरीची घटना पुण्यात घडली आणि ती उघडकीस देखील आली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीकडून तब्बल सहा सहाचाकी, ४ चारचाकी आणि २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. पण, आरोपीकडे केलेल्या कसून तपासात एक आणखी धक्कादायक बातमी पुढे आली त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले.

याप्रकरणी २२ वर्षांच्या अलेक्स लवरेन्स ग्राम्सला पुण्यातील खडकी पोलिसांनी अटक केली आहे. तो खडकी बाजारातील एका गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. आणि त्याने आतापर्यंत एक नाही, दोन नाही तर ७० ठिकाणाहून हजारपेक्षा अधिक बकऱ्या चोरल्या आहेत. त्याच्या या कौशल्याने मात्र पोलिसही आश्चर्य चकित झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी बाजार येथील गुन्हेगारी टोळीतल्या साथीदारांसोबत तो गाड्या चोरत होता. या गाड्यांचा वापर ते विकण्याऐवजी बकरी चोरण्यासाठी करत होता. गावाबाहेर कमी गर्दीच्या ठिकाणच्या गोठ्यात ते एखादा गोठा किंवा बकरी बांधलेले ठिकाण निश्चित करत असत. त्यानंतर चोरलेल्या गाडीत बसून चार ते पाच सदस्य बकरी चोरण्यास मध्यरात्री जात असत.

बकरी ओरडण्याचा आवाज आत झोपलेल्या व्यक्तींना येऊ नये म्हणून चारचाकीचा आवाज सुरू ठेवला जायचा. बकरीच्या जिभेला बाभळीचा काटा लावला जात होता आणि मग अशा अनेक बकऱ्या घेऊन ते आठवडे बाजारात विकत होते. सुशिक्षित तरुणाने बकरी चोरण्यासाठी चलाखी केली. तंत्रज्ञानाचा वापर करून चोऱ्या केल्या. असे असले तरी या बकरी चोऱ्याचा बोलबाला सर्वत्र आहे.