चोरटे झाले लखपती अन पुणेकर झाले कंगालपती ! ; चार वर्षात १५१ कोटींहून अधिक मालमत्ता चोरीला

कधी काळी पुणे शांतताप्रिय अन सर्व सुविधा असणार म्हणून ओळखल जायच. पण, आजच्या पुण्याकडे पाहिल्यानंतर हे तेच पुणे आहे का असा प्रश्न पडावा अशी वाटचाल गुन्हेगारीच्या बाबतीत पुण्याची होऊ लागली आहे. सुख-समाधानांने अन भयमुक्त जीवन जगणाऱ्या पुणेकरांमध्ये आज काही तांसासाठी घराला कुलूप लावून गेल्यानंतर ते परत येईपर्यंत जागेरवर असेल याचा विश्वास राहिला नाही.

  • केवळ बंद घरे फोडून ४१ कोटी पळविले

अक्षय फाटक, पुणे :  आपल्या शहरात सुख अन शांती असल्याची पुणेकरांची भावना आता वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे ‘संपत चालली’ असल्याचे दिसत असून, पुण्यात गेल्या चार वर्षात केवळ घरफोडीकरून चोरट्यांनी तब्बल ४१ कोटीं रुपयांवर डल्ला मारला आहे. तर, घरफोड्या, चैन चोऱ्या, वाहन चोऱ्या अन इतर चोऱ्यांमधील आकडेवारी पाहता चोरटे ‘लखपती’ अन पुणेकर ‘कंगालपती’ होत असल्याची परिस्थिती पाहिला मिळत आहे. कारण, या चारच गुन्ह्यात गेल्या चार वर्षात चोरट्यांनी १५१ कोटींहून अधिक मालमत्तेवर डल्ला मारला आहे. त्यामुळे शांतताप्रिय पुण्यातील गुन्हेगारीची आजची दाहकता कळून येईल.

कधी काळी पुणे शांतताप्रिय अन सर्व सुविधा असणार म्हणून ओळखल जायच. पण, आजच्या पुण्याकडे पाहिल्यानंतर हे तेच पुणे आहे का असा प्रश्न पडावा अशी वाटचाल गुन्हेगारीच्या बाबतीत पुण्याची होऊ लागली आहे. सुख-समाधानांने अन भयमुक्त जीवन जगणाऱ्या पुणेकरांमध्ये आज काही तांसासाठी घराला कुलूप लावून गेल्यानंतर ते परत येईपर्यंत जागेरवर असेल याचा विश्वास राहिला नाही. तर, स्वत:च्या दारात शतपावरली करत असताना देखील दुचाकीवर चोरटे येऊन गळ्यातील सोन साखळी किंवा हातातील मोबाईल चोरून नेत असल्याचे वास्तव आहे. इतकच नाही, तर दुचाकी लावून काही मिनिटांसाठी गेल्यानंतर ती दुचाकी चोरीला जात आहे. दररोज घडणाऱ्या या घटनांना ब्रेक लावण्याचे अपयश पुणे पोलीसांना येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख देखील मोठ्या प्रमाणात वाढच चालला आहे.

काही वर्षापुर्वी पुण्यात सोन साखळी चोरट्यांनी चांगलाच उद् माद माजवला होता. त्यावेळी चार राज्यातील पोलीसांनी एकत्रित या सोन साखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला लगाम घातला. पण, हे चोरटे आता पुन्हा एकटे झाल्याचे दिसत आहे. शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचे देखील हेच वास्तव आहे. आता तेही अॅक्टिव्ह झाले आहेत. दररोज तीन ते चार घरफोड्या व वाहन चोऱ्या होत आहेत. तर, इतर चोऱ्यांची गणतच राहिलेले नाही. पण, पोलीसांना ते सापडत नाहीत. या घटनांना काही केल्या रोखता येत नसल्याचे दिसत आहे.

घरफोड्या तसेच वाहन चोऱ्या गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्या आहेत. त्याचे मुख्य कारण पोलीस खासगित सांगताना म्हणतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजन जामिनावर बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्याचे दिसून आले आहे. काही प्रमाणात हे समोर आले आहे. त्यातही खून, खूनाचे प्रयत्न तसेच मारामारीच्या व दहशत माजविण्याच्या गुन्ह्यांमध्ये हे ठळकपणे दिसून आले आहे. मात्र, असे असले तरी गुन्हेगार बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम किंवा ते काय करतात, याची माहिती स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने ठेवणे गरजेचे आहे.

रेकीकरून घरफोड्या…

शहरात चोरटे रेखीकरून घरफोड्या करत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. सोसायट्यांमुळे शेजारी कोण राहत हे देखील अनेकांना माहिती नसत. त्यामुळे ते घराला कुलूप लावून गेल्यानंतर त्याकडे कोणाचे लक्ष नसते. तर, अनेकवेळा पोलीसांनी सांगूनही मोठ-मोठ्या सोसायंटच्यामध्ये सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही बसवलेले नसल्याचे वास्तव आहे. त्यासाठी पुणेकरांना मात्र जबाबदार धरावे लागले. त्यामुळे या चोरट्यांचे फावते. चोरटे दिवसा रेखीकरून जातात आणि रात्रीत ते घर फोडून ऐवज पळवतात. आवाज येऊ न देता देखील कुलूप तोडण्याची कला अनेक गुन्हेगारांना अवगत आहे.

घरफोडी–गेलामाल— मिळाला माल
२०१७– १४५६९०४३३–३६४०६८१७
२०१८– ९१३८२७७२–१६२४१६४४
२०१९– ७९७६५५०९–३३६९८२१४
२०२०– ५९४५०८६४–१०२२५९३१
जुलै-२०२१ –३५३२१४३६–६९३५९३६
एकूण– ४१ कोटी १६ लाख ११ हजार १४
एकूण मिळाला माल– १० कोटी ३५ लाख ८ हजार ५४२

चैनचोरी– गेलामाल— मिळाला माल
२०१७–६४५१७७०–३७२७१०४
२०१८–७६५५४५०–२९२२८०५
२०१९–४७१३०५०–१३९९४५०
२०२०–२९५१६३०–९६६५१०
जुलै २०२१– २२४१७६०–६२५०००
एकूण माल गेला–२ कोटी ३९ लाख १३ हजार ६६०
एकूण मिळाला माल– ९६ लाख ४० हजार ८६९

वाहनचोरी– गेलामाल— मिळाला माल
२०१७–१५९०३२९८६–५६६८२५७९
२०१८– ११०४११८५८–३५६१९४०२
२०१९–७९७६५५०९–३३६९८२१४
२०२०–४०७३१०००–१३०९५७००
जुलै२०२१–३४२९५७७८–१६३३४९६८
एकूण गेला माल– ४२ कोटी ४२ लाख ३७ हजार १३१
एकूण मिळाला माल– १५ कोटी ५४ लाख ३० हजार ८६३

इतर चोऱ्या– गेलामाल— मिळाला माल
२०१७– १९००१४५५३–८२८२३९३९
२०१८–११८७७७८८३–१४३७९६९३
२०१९–१५०१२४१९९–२९५१४५४५
२०२०–५७५५४६५९–२१३६५००३
जुलै २०२१–४९७१७५१५–२३०५३२३२
एकूण गेला माल– ५६ कोटी ६१ लाख ८८ हजार ८०९
एकूण मिळाला माल- १७ कोटी ११ लाख ३६ हजार ४१२