रस्ते खोदाईमुळे पुणेकर हैराण ; आणि पालिका म्हणतेय, पावसाळ्यातही टाकणार जलवाहिन्या

शहराचा मध्यवर्ती भाग हा प्रामुख्याने पेठांचा आहे. याठिकाणी काम करणे मोठे आव्हाण होते. लॉकडाऊनचा फायदा घेत पाणीपुरवठा विभागाने हे अडचणीचे काम जवळजवळ पुर्ण केले आहे. योजना वेळेत पुर्ण करण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा टप्पा पुर्ण करण्यात आला आहे. ऐरवीर रहदारीच्या वेळी हे काम पुर्ण करणे फार अवघड होते.

    पुणे: पावसाळ्यातही चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु राहणार आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी दिली.शहरात सध्या पेठांमध्ये होत असलेल्या रस्ते खोदाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईनची कामे करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यात सुध्दा सुरु राहणार आहे.

    शहराचा मध्यवर्ती भाग हा प्रामुख्याने पेठांचा आहे. याठिकाणी काम करणे मोठे आव्हाण होते. लॉकडाऊनचा फायदा घेत पाणीपुरवठा विभागाने हे अडचणीचे काम जवळजवळ पुर्ण केले आहे. योजना वेळेत पुर्ण करण्याच्या दृष्टीने हा महत्वाचा टप्पा पुर्ण करण्यात आला आहे. ऐरवीर रहदारीच्या वेळी हे काम पुर्ण करणे फार अवघड होते.

    पुणे शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी ही अतिषय महत्वाकांशी योजना आखण्यात आली आहे. यायोजनेसाठी २ हजार ५५० इतका खर्च होणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा विकास प्रकल्पासाठी कर्जेरोेखे उभारण्यात आले होते. २०० कोटींची कर्जेरोखे महापालिकेने योजनेसाठी उभारले होते. २०१८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून पाच वर्षामध्ये हे काम पुर्ण करण्यात येणार आहे. दोन कंपन्यांना कामाची निविदा मिळाली आहे.

    पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता नंदकुमार जगताप म्हणाले, शहरातील मध्यवर्ती भागातील सुमारे ४० वर्ष जुन्या जलवाहिन्या आणि मलवाहिन्या बदलण्याचे महत्वाचे काम महापालिका प्रशासनाने पुर्ण केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जुन्या वाहिन्या बदलण्याचा महत्वाचा निर्णय घेवून काम पुर्ण करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे २५ किलोमिटरच्या मुख्य जलवाहिन्या बदलण्याचे काम करण्यात आले आहे. यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, याच बरोबर अन्य भागातल्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे १२५ किलोमिटरचे काम पुर्ण करण्यात आले आहे. शिवाजी रस्ता आणि नेहरु रस्त्यावरील वाहिन्या टाकण्याचे काम पुढील टप्यात करण्यात येणार आहे. रहदारीच्या वेळी हे काम करणे शक्य नव्हते. यापुढील काळात लहान वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येईल.डे्रनेज विभागाच्या अधिक्षक अभियंता सुष्मीता शिर्के म्हणाल्या, पाण्याच्या वाहिन्या टाकण्याबरोबर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुध्दा करण्यात आले आहे. यामध्ये दोनवेळा रस्ता खोदावा लागणार नाही. पेठामधील ड्रेजेजलाईन खुप जुन्या झाल्या होत्या. त्याबदलण्याचे महत्वाचे काम करण्यात आले आहे.