पुणेकरांनो सावधान! सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ

शहरात गेल्या चाेवीस तासांत ७ हजार २६ जणांची चाचणी केली गेली. यामध्ये ४३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर २७१ रुग्ण काेराेनामुक्त झाले असुन, सक्रीय रुग्णसंख्या २ हजार ८७१ इतकी झाली आहे. अनलाॅक केल्यानंतर शहरातील रुग्णवाढ हळू हळू हाेत असल्याचे दिसून येत आहे.

    पुणे :  शहरात संशयास्पद काेराेना बाधित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढली अाहे. गेल्या चाेवीस तासांत ४३२ नवीन रुग्ण आढळून आले आहे. काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या तुलनेत काेराेनाबाधित जास्त आढळून येत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या हळू हळू वाढत आहे.

    शहरात गेल्या चाेवीस तासांत ७ हजार २६ जणांची चाचणी केली गेली. यामध्ये ४३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर २७१ रुग्ण काेराेनामुक्त झाले असुन, सक्रीय रुग्णसंख्या २ हजार ८७१ इतकी झाली आहे. अनलाॅक केल्यानंतर शहरातील रुग्णवाढ हळू हळू हाेत असल्याचे दिसून येत आहे. सक्रीय रुग्णांमध्ये २५२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, तर ४५४ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. गेल्या चाेवीस तासांत शहरातील सहा जणांसह एकुण १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात एकुण ४ लाख ८० हजार ५८२ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६९ हजार ८३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ६२८ जणांचा मृत्यू झाला आहे.