अबब.. ६५ टक्के पुणेकरांची SEX TOYS ला पसंती ; ऑनलाईन  बाजारात कोट्यवधींची उलाढाल

पुणे : पुणे शहरात सेक्स टॉईज वापरणाऱ्यांची संख्या इतक्या प्रमाणात वाढली आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.ऑनलाईन बाजारपेठेत या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात आहे. सेक्स टॉईजसारख्या साहित्याचं उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचं सर्वेक्षण केलं.त्यावेळी पुणेकरांचा कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) सेक्स टॉईजकडे (SEX TOYS) कल वाढल्याची माहिती समोर आली आहे.एकीकडे केंद्र शासन पॉर्न साईट्सवर बंदी घालत आहे तर दुसरीकडे SEX TOYS ची ऑनलाइन विक्री जोमात सुरू आहे.

SEX TOYSचा व्यवसाय साडेआठशे कोटींच्या पुढे
एकिकडे सरकारनं पॉर्न साइटवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे SEX TOYS ची ऑनलाइन विक्री जोमात सुरू आहे. भारतातील सेक्स टॉईजचा व्यवसाय साडेआठशे कोटींच्या पुढे असल्याचं सांगितलं जातं आहे. पुणे शहरातही ‘सेक्स टॉईज’चा ऑनलाईन बाजार जोमात असून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. दिल्ली आणि उत्तर भारतातील काही शहरांमधून हा माल पुण्यात पाठविला जात असून कुरिअर कंपन्यांमार्फत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविल्या जात आहेत.

-खरेदीत पुरुषांचे प्रमाण अधिक
खरेदी करणाऱ्यांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण पुरुषांचे असून महिलांकडून खरेदीचे प्रमाणही लक्षणीय आहे.टॉईज मध्ये सेक्स डॉल, तेल, औषधं यांचा समावेश आहे. चीनमधून या वस्तू आयात केल्या जात आहेत आणि दिल्ली, उत्तर भारतातून हा माल ग्राहकांना पुरवला जातो आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये याची विक्री होताना दिसते आहे. कुरिअरमार्फत माल घरपोच दिला जातो आहे.

एकीकडे केंद्र शासन पॉर्न साईट्सवर बंदी घालत आहे तर दुसरीकडे SEX TOYS ची ऑनलाइन विक्री जोमात सुरू आहे. भारतात अशा वस्तूंची जाहिरात करण्यावर बंदी आहे. मात्र तरी वेबसाईटच्या माध्यमातून अशा वस्तूंची जाहीरात केली जाते आहे. यासाठी फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाचा वापर केला जातो आहे. पॉर्न कंटेट पाहणाऱ्यांच्या मोबाइलवर सेक्स टॉयजसंबंधी थेट मेसेज पाठवले जात आहेत. त्यात संबंधित वेबसाईट्सह संपर्कासाठी मोबाइल नंबरही दिला जातो आहे.संपर्काची साधने पूर्णपणे वैयक्तिक आल्याने हे साहित्य सहज उपलब्ध होत आहे. यावर सध्यातरी पोलीस आणि शासकीय यंत्रणांचे कोणतेही नियंत्रण नाही. हे साहित्य विकणाऱ्या घटकांवर कोणत्या कायद्याखाली कारवाई करायची याबाबत संदिग्धता आहे. कारण, या वस्तूंच्या वैयक्तिक वापराला बंदी आल्याचे कायद्यात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही.