
अदार पुनावाला आणि सायरस पुनावाला ही कंपनीच्या मालकांची नावे. जातीवंत घोड्यांची निर्मिती करणारे सायरस आता करोडपती झाले आहेत. ५० वर्षांपूर्वी पुनावाला परिवाराच्या घोडाच्या फार्ममध्ये एका शेडमध्ये सीरम कंपनीची सुरवात झाली. लसीकरणाच्या प्रयोगशाळेसाठी घोड्यांचे दान देण्याऐवजी स्वत:च लसनिर्मिती करता येईल हे त्या काळात सायरस यांच्या लक्षात आले आणि त्यातून कंपनीचा विस्तार झाला.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देत असलेली सिरम संस्था नेमकं करते तरी काय? जगभरात ६० टक्के लहानग्यांना सिरमची लस दिली जाते. जगातील सर्वात मोठ्या लस बनविणाऱ्या कंपनीची कामगिरी खरोखरच थक्क करणारी आहे.
पुण्यातल्या हडपसर परिसरात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कंपनी आहे. जिथे लसींची निर्मिती केली जाते आणि साठवणूकही. कोरोनावर लस शोधणारी कंपनी म्हणून आता सीरम कंपनी चर्चेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही कोरोना लसीची सद्यस्थिती आणि प्रगती पाहण्यासाठी या कंपनीला भेट देत आहेत.
सीरम ही कंपनी लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार कंपनीने आत्तापर्यंत १.५ बिलियन ( अब्ज) लसींचे डोस बाजारात विकले आहेत. हा एकाप्रकारे नवा रेकॉर्डच म्हणायला हवा.
आकडेवारीनुसार जगातील ६५ टक्के लहानग्यांना सिरमची लस एकदा तरी नक्की देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून( WHO) मान्यताप्राप्त असलेली सिरम कंपनी जगातील एक दोन नव्हे तर तब्बल १७० देशांना लसी पुरवत आहे.
पोलिओच्या लसींसोबतच, डिप्थीरिया, टेटनस, पर्टुसिस, HIB, बीसीजी, आर-हेपेटाइटिस बी, मम्प्स आणि रूबेलाच्या लसींची निर्मितीही या कंपनीत करण्यात
घोड्याच्या फार्मपासून सुरुवात आता जागतिक स्थान मिळवलेली कंपनी
पुण्यात घोड्याच्या फार्ममध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती. नुकतीच या कंपनीने नेदरलँडमध्ये बिल्थोवेन बायोलॉजिकल ही कंपनी अधिग्रहित केली आहे. यावरुन गेल्या वर्षांत कंपनीचा पसारा किती वाढला आहे याची कल्पना येऊ शकेल. भागधारकांना हटविले तर सीरम इन्स्टिट्यूट केवळ दोन जण चालवतात.
जातीवंत घोड्यांची निर्मिती करणारे सायरस आता करोडपती झालेत
अदार पुनावाला आणि सायरस पुनावाला ही कंपनीच्या मालकांची नावे. जातीवंत घोड्यांची निर्मिती करणारे सायरस आता करोडपती झाले आहेत.
५० वर्षांपूर्वी पुनावाला परिवाराच्या घोडाच्या फार्ममध्ये एका शेडमध्ये सीरम कंपनीची सुरवात झाली. लसीकरणाच्या प्रयोगशाळेसाठी घोड्यांचे दान देण्याऐवजी स्वत:च लसनिर्मिती करता येईल हे त्या काळात सायरस यांच्या लक्षात आले आणि त्यातून कंपनीचा विस्तार झाला.
पुनावाला परिवार आजही घोड्यांच्या व्यवसायात
सायरस पुनावाला यांना १९६७ साली टीटॅनस लसीची निर्मिती करत कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर सर्पदंशावर मात करणारे एंटीडोट्स, त्यानंतर टीबी, हेपिटायटिस, पोलिओ आणि फ्ल्यूसाठी डोस तयार करण्यात आले. पुण्यात असलेल्या घोड्याच्या फार्मचे रुपांतर लसनिर्मिती कंपनीत झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा वापर करत, गरीब देशांना स्वस्तात लसींचा पुरवठ्याचे कंत्राट पुनावाला यांनी युनिसेफ आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याकडून मिळविले. आता पुनावाला यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत परिवारांत होते. त्यांची संपत्ती ३७ हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.
१७० देशांत लसींचा पुरवठा, एका मिनिटांत तयार होतात ५०० डोस
पुनावाला यांची सीरम कंपनी एका मिनिटात ५०० डोस तयार करते. सध्या ते निर्मिती करत असलेल्या कोरोना लसीमुळे त्यांना जगभरातून विविध देशांच्या आरोग्यमंत्र्यांचे, पंतप्रधानांचे आणि राष्ट्रप्रमुखांचे फोन येत आहेत, ज्यांच्याशी पुनावाला यांचा कधीही संपर्क नव्हता. पुनावाला सांगतात की, ‘कोरोना लस पहिल्यांदा आपल्या देशाला मिळावी, यासाठी सर्वचजण विनंती करत आहेत, पण अर्धवट लसीचा पुरवठा आपण करु शकत नाही. हे सर्वांना समजावण्याचा प्रयत्न मी करतो आहे.’
ऑक्सफोर्डसोबत काम करत आहे सीरम कंपनी
सीरम कंपनी कोरोनावर ऑक्सफोर्डसोबत लसनिर्मिती करीत आहे. एप्रिलमध्ये क्लिनिकल ट्रायल संपण्यापूर्वीच कोरोनाच्या लसीची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली होती. मे महिन्याच्या सुरुवातीला सीरम कंपनीत आक्सफर्डहून एका सीलबंद स्टील बॉक्समध्ये जगातील सर्वात विश्वासू लसीचे सेल्युलर मटेरियल पाविण्यात आले. आता सीरम कंपनीकडून लसीची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे.
सीरमच्या कोरोना लसी भारत आणि जगात ५०-५० टक्के् होणार वाटप
अदार पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर तयार करण्यात येणाऱ्या कोट्यवधी लसी या भारतात आणि जगात ५०-५० टक्के वाटण्यात येणार आहेत. कंपनीचे विशेष लक्ष हे गरीब देशांवर आहे, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र, सरकार यामध्ये गरजेनुसार हस्तक्षेप करु शकणार आहे.
अदार सीईओ झाल्यावर कंपनीच्या उत्पन्नात वाढ
जेव्हापासून अदर पुनावाला यांनी कंपनीचे सीईओपद सांभाळले आहे, तेव्हापासून कंपनीचा विस्तार अनेक बाजारपेठांमध्ये झाला आहे. यामुळे कंपनीचे उत्पन्न ५९०० कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. अनेकांचे जगणे वाचविणाऱ्या लसींच्या निर्माते याबरोबरच फॅन्सी कार आणि जेटमधून फिरणारे अशीही पुनावाला यांची ओळख आहे. देशातील अनेकांना पुनावाला यांच्या व्यवसायाची माहिती नाही. घोड्यांच्या व्यवसायातून संपत्ती मिळवत असल्याचेच अनेकांना माहित आहे. अदर पुनावाला यांनी सीरम कंपनीच्या परिसरात एका जुन्या विमानाचे रुपांतर ऑफिसमध्ये केले आहे.