ऑगस्टपर्यंत शास्तीकर माफ करावा

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात करदात्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मिळकतकरावरील


भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
 पुणे :
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात करदात्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मिळकतकरावरील शास्तीकर या वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत आकारण्यात येऊ नये अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना केली आहे.

तसेच आर्थिक वर्षात मे महिन्या अखेरपर्यंत मिळकतकर भरणार्या करदात्यांना पुणे महापालिकेच्या वतीने मिळकतकराच्या ५ – १०% सवलत दिली जाते. यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुणे शहरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे मिळकतकर भरू इच्छिणार्या अनेक करदात्यांना निर्धारीत सवलतीच्या मुदतीत तो भरता आलेला नाही. त्यामुळे ही सवलतीची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आ