क्रिकेट खेळणाऱ्या मुलांवर दंडात्मक कारवाई! ;  हिंजवडी पोलिसांनी केली कारवाई

देशात कोरोनाच संकट आहे, महाराष्ट्रात देखील वेगळी काही परिस्थिती नाही. मात्र, अनेक आठवड्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात करोना आटोक्यात येत आहे. परंतु, काही जणांकडून नियमांचा भंग होताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर आज हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले क्रिकेट अकॅडमीमध्ये काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती.

    पुणे :  कोरोना नियमांचं उल्लंघन करून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन हिंजवडी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले क्रिकेट अकॅडमी असून, तिथे १३ अल्पवयीन मुले कोरोना नियामाकडे दुर्लक्ष करून क्रिकेट खेळत होती. या मुलांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली आहे.

    देशात कोरोनाच संकट आहे, महाराष्ट्रात देखील वेगळी काही परिस्थिती नाही. मात्र, अनेक आठवड्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात करोना आटोक्यात येत आहे. परंतु, काही जणांकडून नियमांचा भंग होताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर आज हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले क्रिकेट अकॅडमीमध्ये काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती.

    त्यानुसार, संबंधित ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके आणि इतर कर्मचारी पोहचले असता तिथे १३ अल्पवयीन मुले क्रिकेट खेळत असल्याचं आढळून आलं. मुलांनी पोलिसांना बघून सैरावैरा धावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना समज देऊन थांबवलं, हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन जाण्यात आलं. तिथे प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करून मुलांना सोडून देण्यात आलं आहे. पुन्हा अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करू नये अशी समज देखील मुलांना देण्यात आली.