शहरातील खेळाडूंसाठी धावणार ‘पुण्यदशम’ बस ; महापालिकेच्या क्रीडा समितीत ‘या’ प्रस्तावास मंजुरी

महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने शहरात 'पुण्यदशम' योजना सुरू केली आहे. यासाठी तिकीट किंमत १० रुपये आहे. एका दिवसात कितीही वेळा प्रवास करण्यासाठी एकच तिकीट वापरले जाऊ शकते.

  पुणे: बालेवाडी येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सरावासाठी जाण्यास आता या पुणे शहरातून ‘पुण्यदशम’ बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेच्या दिवसातून आठ फेऱ्या केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या क्रीडा समितीत या प्रस्तावास मंजुरी दिली असून स्थायी समितीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी केली केली जाणार आहे.

  महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने शहरात ‘पुण्यदशम’ योजना सुरू केली आहे. यासाठी तिकीट किंमत १० रुपये आहे. एका दिवसात कितीही वेळा प्रवास करण्यासाठी एकच तिकीट वापरले जाऊ शकते. मुख्य रस्त्यांवर दर पाच मिनिटांनी आणि अंतर्गत रस्त्यांवर दर पंधरा मिनिटांनी बस उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर खेळाडूंसाठी बस सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, नुकतीच महापालिकेत पालक संघटनेसोबत बैठक झाली.

  यामध्ये पालकांनी बालेवाडीला जाण्यासाठी खेळाडूंना अडचणी येत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही योजना सुरू करा, अशी मागणी पालकांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव क्रीडा समितीसमोर आणला होता.

  या मार्गावर धावणार 
  स्वारगेट ते बालेवाडी,
  कात्रज ते बालेवाडी,
  पुणे स्टेशन ते बालेवाडी
  शिवाजीनगर ते बालेवाडी