१० लाखाच्या बदल्यात ५७ लाखाची जमीन खरेदी ; दिवेतील सावकारावर गुन्हा

दमदाटी करून व्याजासह ५५ लाखाची मागणी

सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवे गावातील एकावर सावकारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी ऊसने दिलेल्या १० लाखाच्या बदल्यात ५७ लाखाची १५ गुंठे जमिन खरेदी खत करून ती जमीन दुसऱ्याला विक्री केल्याचा प्रकार उघडकीस अाला.

याप्रकरणी सासवड पोलिसांनी दिवे गावातील मारुती रामचंद्र औताडे याच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवे येथील शेतकरी शंकर सोपान टिळेकर (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उसने दिलेल्या १० लाखांचा मोबदल्यात गावातील मारुती रामचंद्र औताडे यांनी गट नंबर १५६ मधील पंधरा गुंठे जमीन (किंमत ५७ लाख रुपये) खरेदी करुन घेतली होती. लहुजी गंगाराम भापकर यांना ती परस्पर विक्री केली आहे. जमिन परत मागीतली असता औताडे यांनी दमदाटी करून व्याजासह ५५ लाखाची मागणी केली. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप पुढील तपास करीत आहेत.

सावकारी विरोधात सुरू असलेल्या मोहीमेमुळे फिर्यादी शेतकऱ्यांनी कार्यालयात येऊन सर्व माहिती दिली. त्याची खात्री करून बुधवारी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे सालकारीचा कोणाला त्रास होत असेल तर नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता आपल्याशी संपर्क करून त्यांची माहिती द्यावी. त्याची खात्री करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

-धनंजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी