बारामती बाजार समितीत हमीभावा पेक्षा कमी दराने मक्याची खरेदी ; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

बारामती : बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नेमली माळेगाव (ता. बारामती) येथे सुरु करण्यात आलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रात शासकीय हमी भावा पेक्षा प्रति क्विंटल ५०० रूपये कमी दराने मकेची खरेदी केली जात असून ही खरेदी तात्काळ बंद करून हमी भावानेच मका खरेदी करावी, अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकले जातील, असा इशारा रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अशोकराव खलाटे यांनी दिला आहे.

बारामती : बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नेमली माळेगाव (ता. बारामती) येथे सुरु करण्यात आलेल्या शासकीय मका खरेदी केंद्रात शासकीय हमी भावा पेक्षा प्रति क्विंटल ५०० रूपये कमी दराने मकेची खरेदी केली जात असून ही खरेदी तात्काळ बंद करून हमी भावानेच मका खरेदी करावी, अन्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकले जातील, असा इशारा रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अशोक खलाटे यांनी दिला आहे.

यासंदर्भात खलाटे म्हणाले ,मकेचा शासकीय हमीभाव सरासरी १८४० रूपये आहे .बारामती बाजार समितीच्या आवारात खरीपातील मकेची खरेदी १४०० रुपये दराने झालेली आहे. खरीपातील तांबडा मका हमीभावापेक्षा ९० टक्के इतक्या कमी भावाने विकला आहे. खरीप मकेचा हंगाम आॅक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान सर्वसाधारणपणे २० दिवस विक्री झालेली आहे. सरासरी आवक ४ हजार क्विंटल प्रमाणे ६ हजार क्विंटल मकेची आवक झालेली आहे. हमीभावाच्या रूपये दर धरला तरी त्याची किंमत ४ कोटी रुपये होते. हा आकडा फक्त बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा असल्याचे खलाटे म्हणाले.

केंद्र सरकारच्या हमीभावास जर कायदेशीर कवच असते, तर त्याची अंमलबजावणी का होत नाही? असा सवाल करून खलाटे म्हणाले, अगदी तालुका स्तरा पासून जिल्हा पातळीवरील कार्यालये याची दखल घेत नाहीत. ही घटनात्मक पायमल्ली आहे. आघाडी सरकारने शेतकरी हितासाठी मकेस ६०० रुपये भरपाई म्हणून शेतक-यांच्या थेट खात्यात वर्ग करावी, बारामती बाजार समितीने मका खरेदी केंद्र बारामती शहरात सुरू करावे, पुढील बाजार भावापासून हमी भावाच्या खाली खरेदी झाली तर, शेतक-यांनी हे लिलाव थांबवावेत, अशी मागणी अशोकराव खलाटे यांनी केली आहे.