प्रा. राजशेखर राठोड यांच्या मजबूत रस्ते निर्मितीसाठीच्या संशोधनास पेटंट

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे सहायक प्राध्यापक राजशेखर राठोड यांच्या 'स्टॅबिलाझेशन ऑफ ब्लॅक कॉटन सॉईल युजिंग क्रशड सँड अँड लाईम' या विषयावरील भारतीय पेटंट नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पेटंटमुळे क्रशड वाळू आणि चुना यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रातील काळ्या मातीच्या भागात मजबूत रस्ता निर्मिती करण्यास मदत होणार आहे. एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर रवांदे यांनी या संशोधनासाठी विशेष मार्गदर्शन केले.

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे सहायक प्राध्यापक राजशेखर राठोड यांच्या ‘स्टॅबिलाझेशन ऑफ ब्लॅक कॉटन सॉईल युजिंग क्रशड सँड अँड लाईम’ या विषयावरील भारतीय पेटंट नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पेटंटमुळे क्रशड वाळू आणि चुना यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रातील काळ्या मातीच्या भागात मजबूत रस्ता निर्मिती करण्यास मदत होणार आहे. एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर रवांदे यांनी या संशोधनासाठी विशेष मार्गदर्शन केले.

या पेटंट विषयी अधिक माहिती देताना, प्रा. राजशेखर राठोड म्हणाले की, गेल्या साडे तीन वर्षापासून या संशोधनावर मी काम करत आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काळी आढळत असल्याने रस्ते निर्मिती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. परिणामी हे आर्थिक दृष्ट्या परवडणारे ही नसते. त्यामुळे मी काळ्या मातीचे अभियांत्रिकी व भौतिक गुणधर्मात बदल करून त्यात चुना आणि क्रशड वाळूचा वापर करून एक मिश्रण तयार केले. याचा उपयोग काळ्या मातीच्या भागात मजबूत रस्ते निर्मितीसाठी होऊ शकतो. क्रशड वाळू आणि चुना यांच्या मिश्रणातून हे शक्य झाले आहे. परिणामी राज्यातील सर्वच भागात मजबूत रस्ते निर्मितीसाठी हे संशोधन महत्वाचे ठरणार आहे.

प्रा. राजशेखर राठोड यांना पेटंट मिळाल्याबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी, अधिष्ठाता डॉ. रजनीश कौर सचदेव, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी अभिनंदन केले.