प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्य सरकारने काही नियम शिथिल करीत बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला थाेडी गती मिळाली. यावर्षी फेब्रुवारी महीन्यात काेराेनाची दुसरी लाट आली, त्यानंतरही लाॅकडाऊन लागू केला गेला. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लाॅकडाऊनचे नियम शिथिल असल्याने बांधकाम क्षेत्रावर अधिक परीणाम जाणवला नाही.

    पुणे : काेराेनाच्या कालावधीतही बंाधकाम परवानगीसाठी महापािलकेकडे रांग लागली आहे. आर्थिक वर्षाच्या पहील्या तिमाहीत बांधकाम विभागाकडे सुमारे पावणे तीनशे काेटी रुपये शुल्क जमा झाले आहे. समाविष्ठ गावामुळे बाधकाम परवानगीची संख्या वाढली आहे.गेल्यावर्षी काेराेनाची पहीली लाट आली, त्यानंतर यंदा दुसरी लाट अाली. या दाेन्ही लाटेमध्ये विशेषत: पहील्या लाटेत बांधकाम क्षेत्रावर माेठ्या प्रमाणावर परीणाम झाला हाेता. बांधकाम क्षेत्राशी संबंधित मजुर, कामगार हे त्यांच्या मुळगावी निघुन गेल्यानंतर बांधकामे ठप्प झाली हाेती.

    -बांधकाम व्यवसायाला मिळाली गती
    राज्य सरकारने काही नियम शिथिल करीत बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला थाेडी गती मिळाली. यावर्षी फेब्रुवारी महीन्यात काेराेनाची दुसरी लाट आली, त्यानंतरही लाॅकडाऊन लागू केला गेला. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लाॅकडाऊनचे नियम शिथिल असल्याने बांधकाम क्षेत्रावर अधिक परीणाम जाणवला नाही.

    -अकराशे काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दीष्ट
    महापािलकेच्या बांधकाम विभागाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल हाेण्याच्या प्रमाणात घट झालेली नाही. शहराच्या मध्यवर्ती भागाप्रमाणेच नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावातूनही बांधकाम परवानगीसाठी अर्ज येत आहे, अशी माहीती बांधकाम विभागातील सुत्रांनी दिली. यावर्षी बांधकाम िवभागाने अकराशे काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. पहील्या तिमाहीत अपेक्षित उत्पन्न मिळाले असुन, दरवर्षी साधारणपणे साडे चार हजार परवानगी दिल्या जातात, यातून आठशे काेटी रुपये उत्पन्न मिळते. नवीन प्रकल्पांप्रमाणेच, पुनर्विकासाकरीता परवानगीकरीता अर्ज येत आहेत.