लॉकडाऊनला फाट्यावर मारत पुण्यातील फार्महाऊसवर पार्टी देहविक्रीसह, विदेशी मद्याची रेलचेल ; पोलिसांनी केली कारवाई

पार्टीसाठी बोलावलेल्या तरुणांचा डान्स सुरु झाला. तरुणींवर पैशांचा पाऊस पडू लागला. यावेळी फार्महाऊसमध्ये देहविक्रीचा व्यवसाय देखील सुरु होता. फार्महाऊसवर सुरु असलेल्या नंगानाचचा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला. त्यातून घटनेचा उलगडा झाला.

    पुणे: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अत्यंत भयावह आहे. दररोज शेकडो लोकांचा कोरोनासंसर्गामुळे जीव जातोय. मात्र पुण्यात एका फार्महाऊसमध्ये लॉकडाऊनची खिल्ली उडवण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन असताना तिथे पार्टी आयोजित करण्यात आली.  पार्टीच्या नावाखाली तिथे सर्रासपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. शेजारच्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

    लॉकडाऊनच्या काळात पैसे कमावण्यासाठी समीर ऊर्फ नितेश पायगुडेने स्वत:च्या फार्महाऊसवर डान्स बार आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी देहविक्री करणाऱ्या सहा तरुणींना फोन करुन बोलावण्यात आले होते.तसेच काही लोकांना इथे मजा-मस्ती करण्यासाठी बोलावण्यात येत होते.

    फार्महाऊसमध्ये दारुसोबतच नाच-गाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. आरोपीने या पार्टीत येणाऱ्यांसाठी विदेशी मद्य मागावले होते. त्यानंतर पार्टी सुरु झाली. डीजेच्या आवाजात मोठ्या उत्साहात पार्टी सुरु झाली. यावेळी पार्टीसाठी बोलावलेल्या तरुणांचा डान्स सुरु झाला. तरुणींवर पैशांचा पाऊस पडू लागला. यावेळी फार्महाऊसमध्ये देहविक्रीचा व्यवसाय देखील सुरु होता. फार्महाऊसवर सुरु असलेल्या नंगानाचचा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला. त्यातून घटनेचा उलगडा झाला.

    आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटना स्थळावर धाव घेतली. मात्र पोलीस आल्याचे पाहताच लोकांची धावपळ सुरु झाली. मात्र पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.