पदवीधर, शिक्षक मतदारांनी भाजपला नाकारले

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपला नाकारले आहे. विधानपरिषदेसाठी झालेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडविला आहे. आघाडीचे अरुण लाड हे पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगांवकर यांनी बाजी मारली आहे.

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपला नाकारले आहे. विधानपरिषदेसाठी झालेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडविला आहे. आघाडीचे अरुण लाड हे पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगांवकर यांनी बाजी मारली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील या दोन्ही मतदार संघातील या निकालामुळे भाजप नेत्यांची झोप उडविणारे ठरले आहेत. पदवीधरची निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. ते स्वतः या मतदारसंघाचे आमदार होते. या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते गेल्यावर्षी पुण्यातील काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आमदार झाले. पुणे पदवीधरची जागा पुन्हा जिंकून ‘ हॅटट्रीक ’करु आणि पहिल्या फेरीत विजय मिळेल असा विश्वास ते व्यक्त करीत हाेते. महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयामुळे पाटील यांची पिछेहाट झाली आहे. शिक्षक मतदार संघात भाजपने जितेंद्र पवार यांना पुरस्कृत केले हाेते. पवार हे लढतही देऊ शकले नाही. विद्यमान आमदार दत्तात्रय सामंत यांनी आसगांवकर यांच्या समाेर आव्हान उभे केले हाेते.
लाड यांनी ४८ हजार ८२४ मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली. देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली. काल सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा विजयी मतांचा कोटा ठरविला गेला. पसंती क्रमांकाच्या पहिल्या फेरीतच लाड यांनी मतांचा काेटा पुर्ण केल्याने शुक्रवारी सकाळीच त्यांचा विजय निश्चित झाला हाेता. प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.

मनसेच्या रुपाली पाटील यांना ६ हजार ७९३, अपक्ष उमेदवार श्रीमंत काेकाटे यांना ६ हजार ५७२ आणि जनता दलाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना ४ हजार २५९ तर वंचित बहुजन आघाडीचे साेमनाथ साळुंखे यांना ३ हजार९३९ मते मिळाली.
शिक्षक मतदार संघात विजयी उमेदवार ठरविण्यासाठी २४ हजार ११४ मतांचा काेटा ठरविण्यात आला. पहील्या पसंती क्रमांकाच्या मतमाेजणीत आसगांवकर यांना १६ हजार ८७४ मते मिळाली. परंतु विजयी मतांचा काेटा न गाठल्याने पसंतीक्रमानुसार मतमाेजणी केली गेली. यात एकाेणीसाव्या फेरीअखेर आसगांवकर यांना १७ हजार ४०० मते मिळाली आहे. तर भाजप पुरस्कृत पवार यांना ५ हजार ९४७ आणि विद्यमान आमदार सावंत यांना ११ हजार २८८ मते मिळाली हाेती. आसगांवकर यांच्याकडे निर्णायक आघाडी असून, सर्व फेऱ्यांची माेजणी झाल्यानंतर त्यांच्या विजयाची अधिकृत घाेषणा केली जाईल.