भावडी येथे लोणीकंद पोलिसांची हातभट्टीवर धाड

वाघोली : (ता. हवेली) पासून जवळच असलेल्या मौजे भावडी गावचे हद्दीत खडी मशीनजवळ चालू असलेली हातभट्टी लोणीकंद गुन्हे शोध पथकाने उद्धवस्त केली.

 महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल; नागरिकांमधून समाधान  

वाघोली : (ता. हवेली) पासून जवळच असलेल्या मौजे भावडी गावचे हद्दीत खडी मशीनजवळ चालू असलेली हातभट्टी लोणीकंद गुन्हे शोध पथकाने उद्धवस्त केली. तसेच झोपडपट्टी परिसरात गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-धडक कारवाईची मोहीम सुरु

वाघोली गावचे हद्दीत गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना मौजे भावडी गावचे हद्दीत खडी मशीन जवळ एक महिला हातभट्टी लावून दारू काढत असल्याची माहिती मिळाली. खात्रीलायक माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने गावठी हातभट्टीवर छापा टाकला. महिलेच्या कब्जातील एकूण सात हजार रुपये किंमतीचा मिळून आलेला माल पोलिसांनी जागीच नष्ट केला. खडी मशीन जवळ बोरकर वस्ती येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेसह झोपडपट्टी परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे शोध पथकाने कारवाई करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लपूनछपून चालू असणाऱ्या अवैध हातभट्ट्या व गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम सुरु केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, आशा इटनर, कीर्ती नरवडे यांनी केली.