पिंपरी पोलिस चौकी शेजारी ‘स्पा’ सेंटर मधील वेश्या व्यवसायावर छापा

पिंपरी भाजी मंडई येथे सृष्टी स्पा सेंटर मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

    पिंपरी:पोलिस चौकी शेजारी स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

    अक्षय शरद भालेराव (वय २३, रा. निगडी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहुल जाधव, वैशाली मॅडल, वैभव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक जमीद तांबोळी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी भाजी मंडई येथे सृष्टी स्पा सेंटर मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

    याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम३,४,५ प्रमाणे तसेच भारतीय दंड विधान कलम ३७०(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अक्षय याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.