दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा कहर

परतीच्या पावसाने आपला लहरीपणा दाखवत दिंडोरी तालुक्यातील (Dindori district) काही गावामध्ये अव्वाच्या सव्वा पडल्याने शेतकरीवर्ग (Farmers) हतबल झाला आहे. खरीप हंगामातील (Kharif season) नगदी भांडवल देणारे सर्व पिके आता या पावसाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

दिंडोरी :  दिंडोरी तालुक्याच्या (Dindori district) पश्चिम पट्ट्यात त्यात लखमापूर, म्हेळुसके, दहेगाव वागळुद, परमोरी, ओझरखेड इ.भागात पावसाने कहर (Rains in the western part of Dindori) करीत शेतकरी वर्गाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. परतीच्या पावसाने आपला लहरीपणा दाखवत दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये अव्वाच्या सव्वा पडल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. खरीप हंगामातील (Kharif season) नगदी भांडवल देणारे सर्व पिके आता या पावसाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या परतीच्या पावसाने सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग  आदी पिकांची पूर्णपणे वाट लागल्याने शेतकरीवर्ग या नैसर्गिक आपत्तीने मेटाकुटीस आला आहे.

टाेमॅटाेला चांगला भाव असल्याने शेतकरीवर्ग आनंदात हाेता; मात्र आता या पावसाने त्यावर विरजण घातले आहे. रब्बी हंगाम व खरीप हंगाम शेतकरीवर्गाला खडतर गेल्याने व भांडवल जास्त व उत्पन्न कमी झाले हाेते. त्यामुळे शेतकरीवर्गाला पुढील हंगामासाठी नगदी भांडवल कसे तयार करायचे, असा सवाल निर्माण झाला आहे.

सध्याच्या पावसाने टाेमॅटाे पिकांना मोठ्या प्रमाणात हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता पुढे काय? ही समस्या शेतकरी वर्गाचा चिंतेचा विषय बनवून राहिली आहे. पावसाने या दोन ते तीन दिवसात भयानक कहर केल्याने धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. शेतकरी वर्गाची या हंगामातील दयनीय अवस्था सोडवण्यासाठी शासनाकडून काय घोषणा होते, याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या परिस्थितीत दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठ शासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून उत्पन्नाच्या सरासरीनुसार प्रत्येक शेतकरी वर्गाला भरपाई द्यावी. तसेच द्राक्षाचा हंगाम घेण्यासाठी शासनाने शेतकरी वर्गासाठी विशेष स्वरुपाची पॅकेज पध्दतीची योजना उपलब्ध करून द्यावी.

अजित कड, दहेगाव वागळुद