राज ठाकरे तीन दिवस पुणे दौर्‍यावर! ; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व

-बैठकांचा कार्यक्रम ठरला

  पुणे : राज ठाकरे गेल्या आठवड्यात आले नवीन कार्यालयाचे उदघाटन करून गेले. आता या आठवड्यात पुन्हा ते पुण्याच्या दाैऱ्यावर येत आहे. या दाैऱ्यातील दाेन दिवस ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. अर्थातच महापािलकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दाैरा असला तरी ताे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह निर्माण करताे हे पुढील काळच ठरवेल.

  मनसेच्या पुणे शहरातील नवीन कार्यालयाचे गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. सध्या ते नाशिक जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आहेत, तेथून ते पुण्याला तीन दिवसाच्या मुक्कामाला येत आहे. आगामी महापािलका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांचे दाैरे सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. फेब्रुवारी महीन्यात महापािलका निवडणुक हाेऊ घातली आहे. इतर पक्षांप्रमाणेच आता मनसैनिकही कामाला लागले आहे. पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी राज ठाकरे हे स्वत: शाखाध्यक्ष, पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधणार आहे.

  ठाकरे हे रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर ते सोमवारी व मंगळवारी विधानसभा मतदारसंघ निहाय पाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. तसेच बुधवारी कोरोना काळात उल्लेखनिय काम करणार्‍या संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून त्यांचा सन्मान करणार आहेत. साेमवार ( १९ जुलै ) आणि मंगळवार ( २० जुलै ) या दाेन दिवशी खास बैठका आयोजित केल्या आहेत. या दाैऱ्याविषयी पक्षाचे नेते बाबु वागसकर, गणेश सातपुते, रणजित शिराेळे, शहर प्रमुख वसंत माेरे यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली.

  प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा करीश्मा राहणार नाही. यावेळी प्रभाग रचनाही बदलणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.

  -बाबु वागसकर, मनसेचे नेते

  ‘‘ २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मनसेचे संख्याबळ घटले. केवळ दाेनच नगरसेवक असुन शहरातील महत्वाच्या विषयावर आम्ही आवाज उठविला आहे. दोन सदस्यीस प्रभाग पद्धतीत निश्चित पक्षाचे संख्याबळ वाढेल.’’

  -वसंत माेरे , मनसे , शहर प्रमुख.