रामलिंग महिला उन्नती संस्थेकडून कवठे येमाईत १५ कोरोना योद्ध्यांचा गौरव

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई व परिसरातून मागील ३ महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या १५ जणांचा रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी (राणी) कर्डिले यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई व परिसरातून मागील ३ महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या १५ जणांचा  रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी (राणी) कर्डिले यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.
         सुमारे १७ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई व परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी ओळखत मागील ३ महिन्यापासून अहोरात्र कोरोना योद्धा म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा मुख्य संघटक तथा जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे,शिरूर पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे,कवठे येमाई प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश कट्टीमणी,डॉ.कल्याणी शेटे, सरपंच अरुण मुंजाळ,मलठणचे सरपंच प्रकाश गायकवाड, पत्रकार राजाराम गायकवाड,देवकीनंदन शेटे,सतीश भाकरे,योगेश कहाणे सर,अमोल शिंदे,नितीन मुखेकर,गणेश काळे,अनिल रायकर,संदीप सांडभोर यांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
         कोरोना महामारीच्या मागील ३ महिन्यांच्या काळात परिसरातील ग्रामस्थ, महिला,जेष्ठ नागरिकांना आलेल्या अडचणी, गोरगरीबांना धान्य,शिधा,किराणा साहित्य व वेळोवेळी वैद्यकीय मदत मिळण्याकामी व कोरोना विषाणूपासून गाव सुरक्षित राहण्याकामी या सर्वांनी स्थानिक तरुणांना सोबत घेत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी,तलाठी,पोलीस प्रशासन,आरोग्य विभागास वेळोवेळी सहकार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची पावती म्हणून रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.