बापरे ! पुण्याच्या ‘या’ भागात आढळला रानगवा

पुणे : बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कोथरूडमधील महात्मा सोसायटी भागात रानगवा ( बायसन) आढळून आला. पहाटेच्या पहाटे फिरायला गेलेले नागरिक हा रानगवा पळापळ करू लागल्याने घाबरले होते.

पुणे : बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कोथरूडमधील महात्मा सोसायटी भागात रानगवा ( बायसन) आढळून आला. पहाटेच्या पहाटे फिरायला गेलेले नागरिक हा रानगवा पळापळ करू लागल्याने घाबरले होते.

बुधवारी पहाटे महात्मा सोसायटीच्या लेन नंबर १ मध्ये त्याचे सर्व प्रथम दर्शन झाले. सुरुवातीला सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्यांना तो रेडा किंवा म्हैस असावा असे वाटले होते. परंतु जेव्हा त्यांना रानगवा असल्याचे समजल्यानंतर नागरिक घाबरुन गेले.

ही बातमी परिसरात जंगलातील आगीसारखी पसरली. अनेक नागरिक प्राणी पाहण्यासाठी बाहेर पडले. रानगव्याने एका उंच सिमाभिंतीवर उडी मारली आणि तेथील मोकळ्या जागेत गेला. भिंत ओलांडून जाण्याचा प्रयत्न करताना तो जखमी झाला आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी वनविभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्यांना याची माहिती दिली. स्थानिक पोलिस स्टेशनच्या अधिकार्यांनाही याची माहिती देण्यात आली.

कोथरूड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील तांबे म्हणाले, “ कोथरूडमधील महात्मा सोसायटीच्या लेन नंबर १ येथे आढळलेल्या रानगव्यास पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ”तर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “कोथरूड परिसरात आज सकाळी रानगवा आढळून आला असून रानगव्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. माझे वन अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून त्यांची टीम रेस्क्यू काम युद्धपातळीवर करत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आणि गर्दी न करता वन विभागाच्या टीमला सहकार्य करावे, लवकरच रेस्क्यू पूर्ण होईल.”