rape

पिंपरी : विवाहितेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगून, तसेच स्वतः पत्नीपासून घटस्फ़ोट घेण्याचे सांगत लग्नाचे अमिष दाखवून एका विवाहितेवर बलात्कार केला. हा प्रकार श्लोका लॉज, डांगे चौक वाकड येथे १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत घडला.

सागर हिमांशू शेठ (वय ३१, रा. ग्लोबल सिटी, विरार पश्चिम) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. १७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर शेठ याने पीडित विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यासाठी तिला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. आरोपी सागर याचे देखील लग्न झाले असून आपणही आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे अमिष त्याने विवाहितेला दाखवले. दोघांनी आपापल्या जोडीदारांपासून घटस्फोट घेतल्यानंतर आपण लग्न करू असे म्हणत त्याने विवाहितेला डांगे चौकातील श्लोका लॉज येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत विवाहितेने १५ दिवसानंतर पोलिसांत तक्रार दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.