अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकावर गुन्हा दाखल

मंचर : आंबेगाव तालुक्यातील खडकीफाटा येथे अल्पवयीन मुलीवर केल्या प्रकरणी ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या विरोधात नांदगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने नांदगांव पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असुन सदर घटनास्थळ मंचर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने गुन्हा मंचर पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातुन सदर अल्पवयीन मुलीचे कुटुंबिय ऊसतोड करण्यासाठी खडकी फाटा येथे एका शेतकऱ्यांच्या शेतावर आले होते. ते खडकीफाटा येथे झोपडी करुन राहत होते. तेथेच त्यांच्यासमवेत ट्रॅक्टर ड्रायव्हर सागर राठोड ( आंबेउपळे ता.कन्नड जि.औरंगाबाद ) हा राहत होता. सागर राठोड यांने ऑक्टोबर २०१९ या महिन्यात सदर अल्पवयीन मुलीला शेतात एकटे काम करताना पाहुन तिच्या तोंडावर हात ठेवुन जबरदस्ती ऊसाच्या शेतात नेवुन तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी संबधित पिडीत अल्पवयीन मुलीला दम देवुन  तिला आणि तिच्या आई वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडीत मुलगी गप्प राहिली. ऊसतोडणीचे काम संपल्यानंतर संबधित कुटुंब त्यांच्या मुळ गेले. मंगळवार दि.१६/६/२०२० रोजी पिडीत मुलगी हिच्या पोटात दुखु लागल्याने तिच्या आईने ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता ती गर्भवती असल्याने आणि बाळंतपणाची वेळ जवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुधवार दि.१७ रोजी पिडीत मुलीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिला तिच्या आईने विश्वासात घेवुन पिडीत मुलीने सांगितले कि खडकी ता.आंबेगाव येथे आपल्यासोबतच ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टरवर काम करणारा सागर राठोड याने माझ्यावर जबरदस्ती करुन बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानुसार नांदगांव पोलिस ठाण्यात आरोपी सागर राठोड याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनास्थळ मंचर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने सदर गुन्हा मंचर पोलिस ठाण्याकडे शुक्रवार दि.२६ रोजी सायंकाळी वर्ग करण्यात आला असुन आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे करत आहे.