प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोपी संदीप पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे खेड पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली, असून संदीप भरत ढमाले याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    पिंपरी चिंचवड: गेल्या काही महिन्यापासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीघटना घडल्या आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरू नगर भागात दोन महिन्यापूर्वी अल्पवयीन युवतीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर आरोपी फारार होता. अखेर खेड पोलिसांनी आरोपी संदीप भरत ढमालेला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी संदीपने पीडित युवतीवर चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केला होता. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

    घटनेनंतर आरोपी स्वतः जवळ मोबाईल बाळगत नसल्याने तसेच सातत्याने राहण्याची ठिकाणे बदलात असल्याने पोलिसांना त्याला पकडण्यात अडचणी येत आहेत. पंरतु शनिवारी संदीप पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे खेड पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली, असून संदीप भरत ढमाले याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.