संतापजनक ! लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत ८ लाख रूपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली.

    नारायणगाव : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत ८ लाख रूपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.

    विक्रम देवराम डोंगरे (वय २८, रा. पिंपळवंडी, ता.जुन्नर), असे अटक आरोपीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले तसेच तिच्यावर बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले. तसेच तिला विश्वासात घेऊन अडचणीचे कारण सांगून तिच्याकडून सुमारे ८ लाख रूपये किमतीचे २० ते २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करीत आहे.