rape

शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका महिलेवर जादूटोणा करून ढोंगीबाबा सोबत देखील शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडून वेळोवेळी बलात्कार करून मारहाण तसेच गर्भपात केल्याची घटना घडली असताना या गुन्ह्यातील आरोपीला अटकेनंतर तात्पुरता जामीन मिळालेला असताना पीडित महिलेला आरोपीकडून पुन्हा धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली असून पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून राहुल संजय वाळके रा. पेरणे (ता. हवेली) जि. पुणे असे आरोपीचे नाव आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पीडित महिलेच्या पतीने पेरणे गावातील राहुल वाळके कडून काही पैसे घेतले होते, त्यांनतर राहुलची ओळख महिलेसोबत झाली त्यानंतर राहुलने पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला त्यांनतर महिलेला गुंगीचे औषध देत स्वतः नशापान करून महिलेवर वेळोवेळी बलात्कार करत तिच्यावर जादूटोणा करून महिलेला संमोहित करून महिलेला एका ढोंगी बाबा बरोबर शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडू लागला, त्यांनतर राहुल याने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार करून महिलेला एका हॉस्पिटलमध्ये नेऊन महिलेच्या पतीच्या खोट्या सह्या करून महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले, त्यानंतर पिडीतेला सर्व काही प्रकार असाह्य झाल्यानंतर देखील महिलेवर जीवघेणा हल्ला करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असताना लोणीकंद पोलिसांनी राहुल संजय वाळके रा. पेरणे फाटा (ता. हवेली) याचे विरुद्ध बलात्कार, गर्भपात, मारहाण तसेच जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. यावेळी आरोपी राहुल वाळके याने न्यायालयातून अटकपूर्व जमीन मिळविला आहे, परंतु लगेचच त्याने कोरेगाव भिमा येथे महिलेच्या घरी येऊन तू लोणीकंद पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे असे म्हणून महिलेला मारहाण करत महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी महिलेला मारहाण करून तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांनतर पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली होती त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी राहुल संजय वाळके रा. पेरणे (ता. हवेली) याच्या विरुद्ध पिडीत महिलेचा विनयभंग करत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. त्यांनतर त्याचे वाळके याच्यावर बलात्कार प्रकरणी देखील गुन्हा नोंद करत त्याला अटक करण्यात आलेली होती. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी राहुल वाळके याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती. सध्या न्यायालयाने त्याला तात्पुरत्या जामिनावर सोडलेले असताना आरोपी वाळके हा कोरेगाव भिमा येथे पीडित महिलेच्या घराजवळ जाऊन महिलेला मी तुला पाहून घेतो तुला सोडणार नाही असे म्हणून दमदाटी केली आहे. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत तक्रार दिली आहे. तर यावेळी बोलताना सदर आरोपी हा तात्पुरत्या जामिनावर आलेला असून घडलेल्या घटनेबाबत न्यायालयाला कळविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी सांगितले.