कोरोना रुग्णसंख्येची पुन्हा उसळी; २९३३ नवबाधितांची नोंद, ९२ जणांचा बळी

शहरातील ५५ आणि महापालिका हद्दीबाहेरील ३७ अशा ९२ जणांचा आज मृत्यू झाला. त्यात ६६ पुरुष आणि २६ महिला रुग्णांचा समावेश आहे. मागील चोवीस तासात १८ मृत्यू झाले आहेत.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना रुग्णसंख्या स्थिरावत असताना रविवारी (दि.२) त्यात मोठी वाढ झाली. वाढीचा उंचावणारा आलेख चिंताजनक आहे. आज एकाच दिवशी शहरात २९३३ नवबाधित आढळले. तर, ९२ जणांचा मृत्यू झाला.उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २ हजार ४८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    शहरातील ५५ आणि महापालिका हद्दीबाहेरील ३७ अशा ९२ जणांचा आज मृत्यू झाला. त्यात ६६ पुरुष आणि २६ महिला रुग्णांचा समावेश आहे. मागील चोवीस तासात १८ मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.

    शहरात आजपर्यंत २ लाख १५ हजार ३९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख ९० हजार ४२१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील ३ हजार ३३ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाNया १ हजार ५२१ अशा ४ हजार ५५४ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या ७ हजार ९५४ सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, १ हजार १४९२ जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. रविवारी (दि.२) १८ ते ४४ वयोगटातील ५५२ जणांचे लसीकरण झाले आहे.