महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातील कामाची पावती : राज्यमंत्री विश्वजित कदम

राज्य सरकारचा पारदर्शक कारभार आणि विकासाचे धाेरण हे नागरीकांच्या लक्षात आले आहे.

पुणे : विधानपरीषदेच्या सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला मिळालेले यश म्हणजे गेल्यावर्षभरात राज्य सरकारने केलेल्या कामाची पावती आहे . सुज्ञ मतदारांना राज्य सरकारने वर्षभरात केलेले काम आवडले आहे अशी प्रति्ाक्रीया राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे .
काॅंग्रेसभवन येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पत्रकार परीषदेत कदम बाेलत हाेते. यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय माेरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाळासाहेब बाेडके, शिवसेनेचे महापािलकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी महापाैर कमल व्यवहारे आदी उपस्थित हाेते. तसेच शिक्षक मतदारसंघातील विजयी उमेदवार जयंत आसगांवकर यांचाही यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार केला गेला.
‘‘ महािवकास अाघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ३२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गरीबांना पाेटभर अन्न मिळावे म्हणून शिवभाेजन याेजना सुरू केली. विकास कामे सुरू झाली असतानाच, जगासमाेर काेराेनाचे संकट उभे राहीले. या काेराेनाच्या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आराेग्यमंत्री राजेश टाेपे इतर मंत्री, आराेग्य , महसुल, अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी काेराेनापासून नागरीकांचे संरक्षण करण्याच्या भुमिकेतून काम केले. राज्यासमाेर अार्थिक अडचण असतानाही परीस्थिती नियंत्रणात आणली. हेच काम नागरीकांना आवडले आहे. ’’ असे कदम यांनी नमूद केले.
‘‘गेले वर्षभर भाजपच्या नेत्यांकडून सरकारविषयी खाेटी माहीती नागरीकांमध्ये पसरविणारी विधाने केली जात हाेती. खाेटे आराेप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात हाेता. राज्य सरकारचा पारदर्शक कारभार आणि विकासाचे धाेरण हे नागरीकांच्या लक्षात आले आहे. त्या मतदारांनीच विराेधकांच्या खाेट्या आराेपांना सडेताेड उत्तर दिले आहे. या विजयात तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे. निवडुनआलेले सर्व आमदार हे पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न साेडवून त्यांना न्याय देतील.’’ असेही कदम यांनी नमूद केले.

‘‘ गेल्या तीस वर्षांत शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामामुळेच हा विजय मिळाला आहे . काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शि वसेनेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मला मिळाले आहे. प्रचारासाठी मिळालेला कमी कालावधी, काेराेनाची स्थितीत हे आव्हान पेलले. शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न साेडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’ जयंत आसगांवकर