मान्यताप्राप्त वीज ठेकेदार आर्थिक अडचणीत

राज्यात दीड लाखाहून अधिक शासनमान्य विद्युत ठेकेदार आहेत. त्यांचे कुटुंबीय अवलंबून असलेले कामगार, त्यांची एवूâण आकडेवारी काढल्यास पंधरा लाखापेक्षा जास्त संख्येने या क्षेत्रातील व्यक्ती आर्थिक अडचणीत सापडले आहेत.वर्षभरापासून कामांना घरघर लागली असल्यामुळे अनेकांचे संसार उध्द्वस्त झाले आहेत. ज्यांनी कर्ज घेतली आहेत आणि कामे नसल्याने बँकाचे हप्ते थकले आहेत.त्यांच्या मागे वसुलीचा तगादा लावला जात आहे.

    पिंपरी: कोरोनामुळे राज्यातील सराकारी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यांना राज्य सरकारने मदतीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, राज्यात दीड लाखाहून अधिक शासनमान्य विद्युत ठेकेदार आहेत. त्यांचे कुटुंबीय अवलंबून असलेले कामगार, त्यांची एवूâण आकडेवारी काढल्यास पंधरा लाखापेक्षा जास्त संख्येने या क्षेत्रातील व्यक्ती आर्थिक अडचणीत सापडले आहेत.वर्षभरापासून कामांना घरघर लागली असल्यामुळे अनेकांचे संसार उध्द्वस्त झाले आहेत. ज्यांनी कर्ज घेतली आहेत आणि कामे नसल्याने बँकाचे हप्ते थकले आहेत.त्यांच्या मागे वसुलीचा तगादा लावला जात आहे.काही ठेकेदार कोरोनाचे बळी पडले आहेत.त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था दयनीय झाली आहे.याशिवाय कामे करुनही पेमेंट मिळत नसल्याने ठेकेदार आणि त्यांच्यावर विसंबुन असलेल्या लोकांची कोंडी होत आहे.त्यामुळे राज्य सरकारने या संकटातून ठेकेदार यांना बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. नुकतेच राज्य सरकारने काहि घटकांना मदतीचा हात दिला असून , त्याच धर्तीवर ठेकेदारांनाही मदत पॅकेज मिळावे, अथवा बिनव्याजी पतपुरवठा करुन दीर्घ मुदतीच्या परतफेड हमीवर मदत करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.